शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘क्रांतिज्योती’च्या आदर्शावर वाटचाल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:58 IST

महिलांनी आज अनेक क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्या दोन्हीकडे सक्षमपणे काम करीत आहेत. महिलांनी प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी,.....

ठळक मुद्देसविता पुराम : अर्धनारेश्वरालयात प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा, महिलांसाठी राबविण्यात येणाºया योजनांची जनजागृती

ऑनलाईन लोकमतगोंदिया : महिलांनी आज अनेक क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्या दोन्हीकडे सक्षमपणे काम करीत आहेत. महिलांनी प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी जि.प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सविता पुराम यांनी केले.गुरूवारी (दि.८) जागतिक महिला दिनानिमित्त सालेकसा तालुक्याच्या हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालय देवस्थानात महिला आर्थिक विकास महामंडळ, तहसील कार्यालय सालेकसा, जिल्हा माहिती कार्यालय व सहारा लोकसंचालित साधन केंद्र सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा घेण्यात आला. यात उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी पं.स. उपसभापती दिलीप वाघमारे होते. अतिथी म्हणून अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार प्रशांत सांगळे, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, हिरालाल फाफनवाडे, महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, सहारा लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष अर्चना चुटे, सचिव सुकेशना रहांगडाले, सदस्य सुनिता थेर, दमयंती मौजारे, धनवंता वडगाये, शीला मेश्राम उपस्थित होते.पुराम म्हणाल्या, महिला आता केवळ चूल आणि मूल यापुरत्या मर्यादित न राहता पुरूषाच्या खांद्याला खांदा देवून प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे. त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. महिलांनी कुटुंबाकडे लक्ष देवून काम केले तर त्या सर्वच क्षेत्रात यशस्वी होतील, असेही त्या म्हणाल्या.अध्यक्षीय भाषणात वाघमारे म्हणाले, देशात महिलांना एकीकडे पूजनीय स्थान आहे तर दुसरीकडे तिच्याकडे हिनतेने बघितले जाते. महिलांनी स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. तेव्हा त्या प्रगतीकडे वाटचाल करतील. महिला शिक्षित झाल्या तर त्या त्यांच्या हक्कांबाबत जागरूक होतील. महिलांनी जुन्या परंपरा, रितीरिवाज यांना तिलांजली देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यात समाजाचा उध्दार करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले.या वेळी जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल, आरोग्य विभागाचा एड्स व सिकलसेलबाबत जनजागृती स्टॉल, महिलांच्या हिमोग्लोबीन तपासणीसाठी बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक, पशुखाद्य, मत्स्य लोणचे आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. उपस्थित महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माहितीचे पॉम्पलेट्स व वाटचाल विकासाची ही घडीपुस्तिका वितरित करण्यात आली. या वेळी बचत गटाच्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले.संचालन शालिनी साखरे यांनी केले. आभार माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांनी मानले. कार्यक्रमामासाठी प्रदीप कुकडकर, सुरेंद्र टेंभरे, भुषण कोरे, झनक तुरकर, ढेकवार, देवेंद्र शहारे, लक्ष्मी नागदेवे, प्रशांत बारेवार, छाया मोटघरे, अर्चना कटरे, दुर्गा देशमुख, नैना कटरे, उषा पटले, मंदा करंडे, कामेश्वरी गोंडाणे, सुशीला बघेले, मुकेश भुजाडे, रवी कटरे, पन्नालाल पटले, नैना अग्रवाल यांनी सहकार्य केले. या वेळी सालेकसा तालुक्यातील बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बचत गट, ग्रामसंस्था व साधन व्यक्तिंचा सत्कारसालेकसा तालुक्यातील उत्कृष्ट महिला बचतगट म्हणून जिजाबाई महिला स्वयंसहायता बचतगट पांढरी, चांदणी महिला स्वयंसहायता बचतगट गांधीटोला, मातोश्री महिला स्वयंसहायता बचतगट हलबीटोला, गायत्री महिला स्वयंसहायता बचतगट तिरखेडी; उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून रचना ग्रामसंस्था रोंढा, दर्पण ग्रामसंस्था लोहारा, कचारगड ग्रामसंस्था जमाकुडो व भविष्य ग्रामसंस्था ब्राम्हणटोला; तर उत्तम समुदाय साधन व्यक्ती म्हणून गीता सोनटक्के (कोटजंभोरा), ज्योती चुट े(भजेपार), मंजू कुंभरे (हलबीटोला), मालती मारबते (कावराबांध); तसेच उत्तम पशुसखी म्हणून सुनिता रहांगडाल े(खोलगड), रेखा रहांगडाले (पांढरी), अर्चना सहारे (कहाली), ज्योती दोनोडे (सलंगटोला) यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.महिलांना मुद्रायोजनेचे कर्ज मंजूरया वेळी आमगाव-खुर्द येथील मंजुषा सुर्यवंशी यांना रेडिमेड कापड व्यवसायासाठी ७५ हजार रूपये, उषा वºहाडे यांना किराणा व्यवसायासाठी ७५ हजार रु पये व संतोषी चुटे यांना ७५ हजार रूपये मंडप डेकोरेशन व्यवसायासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या किशोर गटातून बँक आॅफ महाराष्ट्र शाखा सालेकसाच्या वतीने कर्ज प्रकरण मंजुरीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.