शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सव्वा महिन्यापासून अनिल शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘शासकीय काम आणि महिनाभर थांब’ या म्हणीचा आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुध्दा अनुभव येत आहे. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयात सुध्दा वेळीच उपचार केले जात नसल्याने गोरगरीब रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल सव्वा महिन्यापासून भरती असलेल्या ...

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार, अधिष्ठतांच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘शासकीय काम आणि महिनाभर थांब’ या म्हणीचा आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुध्दा अनुभव येत आहे. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयात सुध्दा वेळीच उपचार केले जात नसल्याने गोरगरीब रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल सव्वा महिन्यापासून भरती असलेल्या एका रुग्णावर अद्यापही शस्त्रक्रिया करण्यात आली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.अनिल जयपाल मेश्राम (३५) रा. देवलगाव, ता. अर्जुनी मोरगाव असे सव्वा महिन्यापासून शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार १ जानेवारीला अनिल मेश्राम यांचा साकोलीजवळ अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाचे हाड सरकले. यावर उपचार करण्यासाठी त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. त्यानंतर ते शस्त्रक्रिया करण्यासाठी २८ फेब्रुवारीला दाखल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली नाही. उलट त्यांच्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली. त्यामुळे अनिल मेश्राम यांनी याची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. पण त्यांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केले. तर एका डॉक्टरने त्यांना शस्त्रक्रियागृहात टेबल उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया करण्यास विलंब होत असल्याचे सांगितले. जेव्हा की त्यांच्यानंतर दाखल झालेल्या रुग्णांवर याच शस्त्रक्रियागृहात शस्त्रक्रिया करण्यात आल्या.येथील डॉक्टरांनी अनिलला दिलेले उत्तर सुध्दा तेवढेच मजेदार असून शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थेचे वाभाडे काढणारे आहे. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अनागोंदी कारभाराचा फटका अनिल सारख्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. मागील सव्वा महिन्यापासून आज तरी आपल्यावर शस्त्रक्रिया होईल, या आशेवर अनिल आहे. शस्त्रक्रिया न केल्यामुळे त्यांना काही झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभावयेथील शासकीय महाविद्यालयात आॅपरेशन थिएटरमध्ये सेवा देणाºया वैद्यकीय अधिकाºयांमध्ये समन्वय नसून त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. काही डॉक्टर केवळ त्यांच्या मर्जीतील अथवा त्यांच्या रेफरंसने दाखल झालेल्या रुग्णांवरच शस्त्रक्रिया करतात. त्यामुळे अन्य डॉक्टरांना शस्त्रक्रियागृहात टेबल उपलब्ध होवू दिले जात नसल्याची माहिती आहे. त्याचाच फटका अनिल सारख्या रुग्णांना बसत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वार्ड क्रमांक ५ मध्ये बेड क्रमांक ४ वर अनिल भरती आहे.अधिष्ठातांकडे तक्रारमागील सव्वा महिन्यांपासून अनिल मेश्राम यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी याची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रूखमोडे यांच्याकडे केली. मात्र यानंतर कुठलाच फरक पडला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आता पुन्हा त्यांच्याकडे तक्रार केली. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनिल मेश्राम यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश वार्ड प्रभारी डॉ.मरसकोल्हे यांना दिले असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.