शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:23 IST

सार्वजनिक ग्रंथलयातील सेवकांना वेतन श्रेणी आणि ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तुंटपुंज्या अनुदानावर ग्रंथालय चालविणे कठिण आहे. शासनाने सन २००५ पासून ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ केली नाही.

ठळक मुद्देग्रंथालय चळवळीकडे शासनाचे दुर्लक्ष : कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्याप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअजुनी मोरगाव : सार्वजनिक ग्रंथलयातील सेवकांना वेतन श्रेणी आणि ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तुंटपुंज्या अनुदानावर ग्रंथालय चालविणे कठिण आहे. शासनाने सन २००५ पासून ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ केली नाही. ग्रंथालय चळवळीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. वेतनश्रेणी आणि अनुदानाबाबत राज्य शासनातील मंत्री एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. यामुळे राज्यातील सुमारे २० कर्मचारी व ७० हजार कार्यकर्त्यांत शासनाविरोधात असंतोष आहे.महाराष्ट्रात ग्रंथालय कायदा १ मे १९६७ रोजी लागू झाला. त्याला आता ५१ वर्षे झाली आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतीक सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडणीत ग्रंथालय चळवळीचा मोटा वाटा आहे. राज्य शासनाने ग्रंथालयांना दिल्या जाणाºया अनुदानात २२ सप्टेंबर १९८० रोजीच्या शासन निर्णयाने १ एप्रिल १९८० पासून दुप्पट, २६ नोव्हेंबर १९८९ च्या शासन निर्णयाने १ एप्रिल १९८९ पासून दुप्पट, २३ डिसेंबर १९९४ च्या शासन निर्णयाने १ जानेवारी १९९५ पासून दुप्पट, १ जानेवारी १९९८ च्या शासन निर्णयाने १ जानेवारी १९९८ पासून दुप्पट, १० मार्च २००५ च्या शासन निर्णयाने १ एप्रिल २००४ पासून अनुदानात दुप्पट वाढ केली आहे. वरील शासन निर्णय बघता सन १९८० पासून सन २००४ पर्यंत २४ वर्षात साधारण दर सहा वर्षांनी ग्रंथालय अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली आहे.सन २००४ नंतर २०१० दरम्यान ग्रंथालय अनुदान दुप्पट आणि सन २०१६ दरम्यान सन २००४ च्या चारपट वाढ होणे आवश्यक असताना २१ फेबु्रवारी २०१२ च्या शासन निर्णयाने १ एप्रिल २०१२ पासून अनुदानात केवळ ५० टक्के वाढ केली होती. त्यानंतर राज्य ग्रंथालय संघ व कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी मागणी करुनही ग्रंथालय अनुदानात अद्यापही वाढ करण्यात आलेली नाही. ग्रंथालय कर्मचाºयांना वेतनश्रेणी, ग्रंथालयांना मिळणारे अनुदान, गाव तेथे ग्रंथालय अशा विषयांवर शिफारसी करण्यासाठी शासनाने प्रभा राव आणि व्यंकमा पत्की अशा दोन समित्या नेमल्या होत्या. या दोन्ही समित्यांच्या शिफारसी शासनाने अद्याप स्विकारल्या नाहीत.यामुळे ग्रंथालय आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ग्रंथांची किंमत, वृत्तपत्र आणि नियतकालिक यांच्या किंमतीतील वाढ, वीज दरवाढ, ग्रंथालय भाडे व अन्य आवश्यक बाबींची दरवाढ तसेच महागाई यामुळे कर्मचाऱ्यांना अपेक्षीत वेतन याचा विचार करता ग्रंथालय चालविणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. यामुळे कर्मचारी व ग्रंथालय कार्यकर्त्यांमध्ये शासनाविरोधात असंतोष आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे तर तावडे मुनगंटीवार यांच्याकडे बोट दाखवित असल्याने ग्रंथालय अनुदानाचा विषय तसाच प्रलबिंत पडला आहे.राज्यात सुरु असणारी सार्वजनिक अ, ब, क आणि ड वर्गाची अनुदानित ग्रंथालये अडचणीत आली आहेत. राज्यात सहा विभागात एकूण १२ हजार १४४ ग्रंथालये आहेत. त्यातील ११ हजार ८३१ ग्रंथालये ही गावपातळीवर चालविली जातात. त्यांची अवस्था दयनीय आहे.१० टक्के रक्कम संस्था चालकांचीचसरकार जे अनुदान देते, त्यात संस्था चालक १० टक्के रक्कम स्वत:ची घालतात. अनुदान रकमेतील ५० टक्के रक्कम वेतनावर खर्च करण्याचा सरकारचा नियम आहे. उर्वरित ५० टक्के रकमेत इमारतीचे भाडे, वीज बील, पाणी बील, स्वच्छता, स्टेशनरी याशिवाय पुस्तक खरेदी, नियतकालिके, वर्तमानपत्रांचा खर्चही याच रकमेत करावा लागतो. या आर्थिक अडचणींमुळे गावपातळीवरील ग्रंथालयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :libraryवाचनालय