शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त एकमुस्त रकमेच्या प्रतिक्षेत

By admin | Updated: October 29, 2016 01:19 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधीतांना

प्रकल्पग्रस्तांची व्यथा : अन्यथा व्याजासह मोबदला देण्याची मागणीपुरुषोत्तम डोमळे   सानगडी विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १.११९.६० कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. या पॅकेजनुसार प्रकल्प बाधीत १८ हजार ४४४ कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रक्कम देण्याचे राज्य शासनाने निश्चित केले होते. मात्र प्रकल्पग्रस्त अद्याप रकमेच्या प्रतिक्षेत आहेत.भंडारा व नागपूर जिल्ह्यातील ११ हजार १२९ कुटुंबापैकी ७ हजार ३१५ कुटुंबांना लाभ देण्यात आला. उर्वरीतांना नोकरी ऐवजी एकरकमी मोबदला देण्याचे अध्यादेश राज्य शासनाने १९ आॅगस्ट २०१५ ला निर्गमीत केले आहे. परंतु उपजिल्हाधिकारी भूसंपादन विशेष पॅकेज यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे काही प्रकल्पग्रस्तांना आजपावेतो एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात आला नाही. शासन निर्णय प्रस्तावनेत नमूद वस्तूस्थितीच्या अनुषंगाने खालील संवर्गातील कुटुंबांना नोकरीऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ देण्यास या आदेशान्वये शासन मान्यता देण्यात येत आहे. निवाड्यानुसार एकुण ५९३ कुटुंबांचे नावे रिक्त भूखंड दर्शविण्यात आले असून त्यापैकी कोणत्याही कुटुंबात पॅकेजचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे ५९३ कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुश्त रकमेचा लाभ देण्यात यावा. आदेश निर्गमीत होऊन एक वर्ष लोटला तरी उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग भंडारा यांच्या कार्यालयातील अडेलतट्टू धोरणामुळे आजपावेतो रिक्त भूखंड प्रकल्पग्रस्तांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात आला नाही. दि. ८.११.१५ ला निर्गमीत केलेल्या (गावठान वाढीव कुटुंब) नोटीसात अनेक त्रुटी असल्यामुळे प्रस्ताव सादर करतेवेळी प्रकल्पग्रस्तांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. पाठविलेल्या नोटीसात चुकीची माहिती देण्यात आली होती. विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यावरून उपजिल्हाधिकारी भूसंपादन विशेष पॅकेज कार्यालयाचा भोंगळपणा दिसून येत आहे. रिक्त भूखंड प्रकल्पग्रस्तांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात येणार काय? असा संतप्त सवाल प्रकल्पग्रस्त करीत आहेत. उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभागाच्या कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर रिक्त भूखंड प्रकल्पग्रस्त धारकांना नोकरीऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ द्यावा अन्यथा प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयाचा दार ठोठावल्यास व्याजासह रक्कम द्यावी लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.