शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांपासून डॉक्टरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:10 IST

गोठणगाव येथे श्रेणी २ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला. मात्र गेल्या १७ वर्षांपासून येथे पशु वैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने हा दवाखाना केवळ नाममात्र ठरत आहे.

ठळक मुद्देपशुवैद्यकीय दवाखाना वाºयावर : पशुपालकांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोठणगाव : गोठणगाव येथे श्रेणी २ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला. मात्र गेल्या १७ वर्षांपासून येथे पशु वैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने हा दवाखाना केवळ नाममात्र ठरत आहे.अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव परिसरात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. बरेचदा जनावरांना साथीच्या आजारांची लागण होते. तेव्हा ते जनावरांना उपचारासाठी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेतात. मात्र येथे पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.मागील १७ वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने त्यांना जनावरांवर वेळीच उपचार करणे शक्य होत नाही. यामुळे बरेचदा जनावरांचा बळी सुध्दा गेल्याची माहिती आहे. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जून २००१ पूर्वी डॉ.दुसावार कार्यरत होते. त्यांची दुसºया ठिकाणी बदली झाली. तेव्हापासून येथे दुसºया पशुवैद्यकीय अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली नाही. येथील दवाखान्याचा प्रभार दुसºया डॉक्टरकडे सोपविण्यात आला. मात्र ते सुध्दा या दवाखान्याकडे भटकत नसल्याने पशुपालकांना जनावरांवर वेळीच उपचार करणे शक्य होत नाही. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक डॉक्टर आणि परिचर असे दोन पदे मंजूर आहे. मात्र डॉक्टरचे पद रिक्त तर परिचर सुध्दा अर्जुनी मोरगाव येथे कार्यरत असल्याची माहिती आहे. मागील १७ वर्षांपासून रिक्त असलेले डॉक्टरचे पद भरण्याची मागणी गावकºयांनी अनेकदा जिल्हा परिषद व तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे. दरवर्षी जनावरांना साथ रोगांची लागण होत असते. यावर्षी सुध्दा जनावरांना तोंडखुरी या आजाराची लागण झाली होती. यामुळे काही शेतकºयांच्या शेळ्या देखील या आजाराने दगावल्याची माहिती आहे. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरचे पद रिक्त असल्याने बोंडगाव, गंधारी, जांभळी, सुरबन, कढोली व प्रतापगड भागातील पशुपालकांना अर्जुनी/मोरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना घेवून जावे लागते.इमारतीची दुरवस्थायेथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची सुद्धा दुरवस्था झाली आहे. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दवाखान्याचे समोरील प्रवेशव्दाराचे लोखंडी गेट गायब आहे. परिसरात गवत वाढलेले आहे. बोअरवेल नादुरुस्त आहे. तर परिसरात झाडेझुडपे वाढलेली आहेत. दवाखाना सुरू असल्याचे दाखविण्यासाठी खोटे रेर्काड भरुन पाठविले जात असल्याचा आरोप गावकºयांचा आहे.जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्षपशुपालकांना त्यांच्या जनावरांवर वेळीच औषध उपचार करता यावे. यासाठी येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला. मात्र गेल्या १७ वर्षांपासून रिक्त असलेले पशुवैद्यकीय अधिकाºयाचे पद भरण्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा दवाखाना केवळ नावापुरताच ठरत आहे. दरम्यान येथील रिक्त असलेले डॉक्टरचे पद त्वरित न भरल्यास या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे.