शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा रासायनिक प्रयोगशाळेच्या ‘प्रिझर्व व्हिसेरा’ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST

गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या चुरडी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण याचा तपास करण्यासाठी पोलिसांना उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. डॉ. ...

गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या चुरडी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण याचा तपास करण्यासाठी पोलिसांना उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. डॉ. कांचन रहांगडाले यांनी केलेल्या उत्तरीय तपासणीत मालता रेवचंद बिसेन, मुलगा व मुलगी यांचा मृत्यू त्यांच्या डोक्यावर लागलेल्या मारामुळे होऊ शकतो, तर रेवचंद बिसेन यांचा मृत्यू गळफासामुळे होऊ शकतो, असा अभिप्राय दिला आहे. परंतु, त्या मृतदेहांचे चौघांचे व्हिसेरा प्रिझर्व करून नागपूरच्या रासायनिक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. या प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत पोलिसांना तपास कोणत्या दिशेने करावा हा प्रश्न पडला आहे.

चुरडी येथील घटना घडल्यावर ठाणेदारांपासून ते जिल्ह्याचे सर्वच बडे अधिकारी येथे ठाण मांडून आहेत. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. या घटनेसंदर्भात तिरोडा ठाणेदाराला सूचना दिल्या आहेत. खैरबोडी येथील अंकुश चामलाटे यांच्या तक्रारीवरून या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार योगेश पारधी करीत आहेत. या प्रकरणाची गुंतागुंत सोडविण्यासाठी आता सायबर सेलही कामाला लागला आहे. सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांचेही पथक या खुनाच्या प्रकरणाचा तपास करीत आहे. या चौघांच्या हत्येपूर्वी त्यांचे मोबाईल कॉल कनेक्शन या घटनेतील आरोपींपर्यंत पोहोचवतील असा विश्वास आहे. मागील महिनाभरात या चारजणांनी कुणाकुणाशी संपर्क केला, त्यांचे झालेले संभाषण, चॅटिंगही या घटनेचा उलगडा करण्याची शक्यता आहे.

............

चौथ्या दिवशी गूढ कायमच

चुरडी येथे एकाच घरी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २१) उघडकीस आली. यात तिघांच्या डोक्यावर लोखंडी अवजड वस्तूने प्रहार करून खून करण्यात आल्याचे उघड झाले. मात्र, चौथा मृतदेह गळफास लागलेल्या स्थितीत आढळल्याने प्रकरणातील गूढ वाढले. यात त्या कुटुंबप्रमुखाची हत्या की आत्महत्या, हे गूढ उकल झाल्यावरच मारेकरी होणार उघड. मारेकरी घरचा की बाहेरचा, हेही ठरणार; पण हत्या की आत्महत्या हा गुंता वाढल्याने प्रकरणातील गूढ चौथ्या दिवशीही कायम आहे.

..........

चुरडीला आले पोलीस छावणीचे स्वरूप

चुरडी येथील घटनेतील गूढ वाढत आहे, तर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तिरोडा पोलीस, गंगाझरी पोलीस, सीआरपीएफ, पॅरामिलिटरी फोर्स व गोंदिया येथील राखीव पोलिसांच्या तुकड्या तिरोडा शहर व चुरडी येथे तैनात करण्यात आल्या आहेत.

......

सत्यता पुढे येण्यासाठी राजकारणी आक्रमक?

चुरडी हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पोलीस विभागाने पाच टीम स्थापित केल्या. या पाचही टीमच्या तपास आणि चौकशीत आतापर्यंत काय मिळाले याकडे लक्ष लागले आहे; परंतु आतापर्यंत काय आढळले ते पोलीस माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तपासाचा भाग सांगून निरुत्तर होत आहेत. त्यामुळे आता राजकारणी या प्रकरणाची सत्यता पुढे आणण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.