शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

११ वर्षापासून २८ डॉक्टरांना स्थायी होण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: September 25, 2016 02:23 IST

एकीकडे एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता असल्याने आरोग्य संस्थेत २५ जागा रिक्त आहेत.

फक्त मिळते आश्वासन : मॅग्मोमार्फत केले होते आंदोलनगोंदिया : एकीकडे एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता असल्याने आरोग्य संस्थेत २५ जागा रिक्त आहेत. तर दुसरीकडे मागील ११ वर्षापासून २८ बीएएमएस डॉक्टरांना स्थायी होण्याची प्रतिक्षा आहे.एमबीबीएस डॉक्टरांची कमी भासू नये यासाठी राज्य सरकार द्वारे बीएएमएस डॉक्टरांना नियुक्ती देण्यात येते.हे सर्व डॉक्टर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात अस्थायी डॉक्टर म्हणून सेवा देत आहेत. परंतु त्यांना शासकीय सुविधेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. कार्यरत असताना मृत्यू झाल्यास शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना काहीच मिळत नाही.त्यामुळे अस्थायी डॉक्टरांमध्ये असंतोष आहे.एमबीबीएस डॉक्टरांच्या अभावामुळे शासनाने आयुक्त व आरोग्य सेवा उपसंचालक यांनी २००५ मध्ये राज्यात ७९१ डॉक्टरांना नियुक्त केले. बीएएमएस डॉक्टर जिल्ह्याच्या दुर्गम भागात सेवा देतात. या डॉक्टरांना एक दिवसाचा खंड देऊन नियुक्ती दिली जाते. वार्षिक वेतन वाढ, विमा, अंशदायी सेवानिवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी या सारख्या योजना या डॉक्टरांना लागू केले जात नाही.यामुळे अस्थायी डॉक्टरांमध्ये असुरक्षीतेची भावना आहे. जिल्ह्यात २८ अस्थायी वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) गट ब कार्यरत आहेत. या अस्थायी डॉक्टरांना समान वेतन मिळत नाही. काही लोक स्थायी होणे योग्य आहे. तर काही वय ओलांडत चालले आहे. लिखनलाल कुंभरे या डॉक्टरला कर्करोगाने पछाडले आहे. ते अस्थायी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना शासकीय लाभ मिळणार नाही. (तालुका (प्रतिनिधी)