शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८८०० शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर करून दिल्या असून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकºयांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्दे१४ व्या ग्रीनलिस्टकडे नजरा : कर्जमाफीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर करून दिल्या असून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.आजघडीला शेती करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. निसर्गाच्या मर्जीवर शेतीचा कारभार चालत असून मागील दोन-तीन वर्षांत निसर्गाने साथ न दिल्याने लोकांच्या पोटाची व्यवस्था करणारी शेती शेतकऱ्यांसाठीच मृत्यूचा मार्ग बनली. कर्ज काढून शेती करणारे शेतकरी यात चांगलेच फरफटल्याने शासनाने आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून कर्जमाफीची योजना सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणून ही योजना राबविली जात आहे.या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ८२ हजार ४७४ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची प्रक्रीया सुरू केली. यात कर्जमाफी करण्यात आलेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट काढली जात असून आतापर्यंत अशा १३ ग्रीन काढण्यात आल्या आहेत. त्यातील १२ व्या ग्रीन लिस्टपर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकºयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. म्हणजेच आता ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. परिणामी त्यांना धाकधूक होत आहे.मागील वर्षभरापासून शासनाकडून एक-एक करून आतापर्यंत १३ ग्रीन लिस्ट आल्या. मात्र त्यात आपले नाव नसल्याने उरलेल्या या ८ हजार ७४२ शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे. कधी यादी येते व त्यात आपले नाव दिसते याचीच या उर्वरीत शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे. त्यामुळे आता या सर्वांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.१३ व्या ग्रीनलिस्टची जुळवणी सुरूशासनाकडून आलेल्या १३ व्या ग्रीन लिस्टमध्ये जिल्ह्यातील १५६ शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आलेल्या ग्रीनलिस्टची जिल्हास्तरावर जुळवणी केली जाते व त्यात काही त्रुटी असल्यास किंवा नावे पुन्हा आल्यास त्याबाबत कळविले जाते. ही प्रक्रीया झाल्यावर तसे कळवून निधी मागविला जाते. यामुळे सध्यातरी १२ व्या यादीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आकडा धरला जात आहे. या यादीची जुळवणी झाल्यानंतर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.