शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

एक लाख लोकांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 21, 2015 01:05 IST

सालेकसा तालुक्यात एकूण ८६ गावे आणि सात रिठी गावं मिळून जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे.

विजय मानकर सालेकसासालेकसा तालुक्यात एकूण ८६ गावे आणि सात रिठी गावं मिळून जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे. परंतु या लोकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे म्हणून तालुकास्तरावर किंवा ग्राम पंचायत स्तरावर कोणतीच पाणी पुरवठा सुरू नसल्याने नागरिकांना शुध्द पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी दरवर्षी तालुक्यात उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार बळावून जीवघेणे संकट ओढवते, मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी अजूनही गांभीर्याने विचार करून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तत्पर नसल्याचे दिसून येते.अनेक वर्षापासून सालेकसा तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी काही सुज्ञ लोकांनी नळ योजना स्थापित करून नागरिकांना शुध्द पाणी मिळावे म्हणून धावपळ करीत राहिले. काही गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर नळ योजना उभारण्यात करण्यात आल्या, परंतु ग्राम पंचायतीच्या पैसेखाऊ वृत्तीच्या पदाधिकाऱ्यांमुळे पाणी पट्टीची वसुली तर करण्यात आली, परंतु विजेचे बिल भरण्यात आले नाही. त्यातून काही ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात ग्राम पंचायती अपयशी ठरल्या. परिणामी आज काही ग्राम पंचायतींचा अपवाद वगळल्यास कोणत्याही ग्राम पंचायतीची ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू नसून थंडबस्त्यात पडून आहेत.सालेकसा तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात पाण्यातील जीवाणूमुळे पिलीया, मलेरिया, टायफाईड, कॉलरासारखे जीवघेणे आजार वेगाने पसरतात. या आजारांचे थैमान वाढल्यास आरोग्य विभाग सुध्दा गुडघे टेकतो व अनेक रुग्ण दगावतात. हा क्रम सालेकसासारख्या मागासलेल्या तालुक्यात दरवर्षी चालतो. हे या तालुक्याचे मोठे दुर्दैव ठरत आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून दीर्घकालीन व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार विंधन विहिरीआमदार-खासदार निधीतून किंवा इतर योजनेतून विंधन विहीर मंजूर करताना राजकारणी लोक योग्य जागेचा विचार न करता कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार नको तिथे बोअरवेल्स देतात. परिणामी अनेक बोअरवेल्स पाण्याच्या बाबतीत यशस्वी ठरत नाही. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नसल्याने अशा बोअरव्ोल्समधून शुद्ध पाण्याऐवजी गढूळ पाणी निघते. ग्रामीण भागातील लोक नाईलाजाने तेच पाणी वापरतात आणि अनेक आजार उद्भवतात.