शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बोनसची प्रतीक्षा संपली; खरिपात शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 15:32 IST

Gondia News खा. प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळेल असा शब्द दिला होता. तोच शब्द त्यांनी पाळला असून राज्य सरकारने बुधवारी बोनसचा पहिला टप्प्यात ४७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

ठळक मुद्दे प्रफुल्ल पटेलांनी पाळला शब्द पहिल्या टप्प्यात ४७७ कोटी

 लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र बोनस मिळण्यास विलंब होत झाल्याने तो मिळणार की नाही असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. पण खा. प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळेल असा शब्द दिला होता. तोच शब्द त्यांनी पाळला असून राज्य सरकारने बुधवारी बोनसचा पहिला टप्प्यात ४७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस ५० क्विंटलपर्यंत देण्याची घोषणा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केली होती. खा. प्रफुल्ल पटेल हे शेतकऱ्यांना बोनस मिळण्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होेते. त्यांनी गोंदिया-भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनस मिळणारच अशी ग्वाही दिली होती.

आठ दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून बोनसची रक्कम त्वरित उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. तेव्हा आठ दिवसात बोनसची रक्कम उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली होती. त्याचीच पूर्तता करीत खा. प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर बुधवारी (दि.३०) पहिल्या टप्प्यात ४७० कोटी रुपयांचा निधी बोनससाठी उपलब्ध करुन दिला आहे. तर उर्वरित निधी येत्या १५ दिवसात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी यासाठी माजी आ.राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे हे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खा. प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहे.

पूर्व विदर्भातील पाच लाखावर शेतकऱ्यांना दिलासा

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली होती. यासर्व शेतकऱ्यांना बोनस स्वरुपात रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मदत होणार असल्याने दिलासा मिळाला आहे

टॅग्स :agricultureशेती