शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील ७२४६७ शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ

By admin | Updated: June 13, 2017 00:53 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन १ जून पासून शेतकऱ्यांचे व विविध संघटनांचे आंदोलन सुरू होते.

२५४ कोेटी १७ लाख कर्ज : पाच एकरापेक्षा कमी शेतकऱ्यांना लाभलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन १ जून पासून शेतकऱ्यांचे व विविध संघटनांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची फलश्रृती म्हणून राज्य सरकारने अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीचा फायदा गोंदिया जिल्ह्यातील ७२ हजार ४६७ शेतकऱ्यांना होणार आहेत. त्यांचे २५४ कोटी १७ लाख रूपये माफ होणार आहेत. जिल्ह्यात ९१ हजार ३४६ अल्प, मध्यम व मोठे शेतकऱ्यांवर ३२६ कोटी ५३ लाख रूपयाचे कर्ज आहे.या संदर्भात ३१ मार्च २०१७ रोजी यासंदर्भात शासनाला माहिती पाठविण्यात आली.यात ७२ हजार ४६७ शेतकरी अल्प व मध्यम आहेत. त्यांच्यावर २५४ कोटी १७ लाख कर्ज आहे, अशी माहिती दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉ-आॅपरेटिव्ह बैंकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर.वासनिक यांनी दिली आहे. जिल्ह्यातील अल्प व मध्यम शेतकरी या कर्जमाफीच्या लाभात शासनाच्या नियमानुसार येतील असे ते म्हणाले. अल्प व मध्यम भूधारकांमध्ये पाच एकरपेक्षा कमी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे याचा बँकाना फायदा होणार आहे. बँकाचे शेतकऱ्यांवर वर्षानुवर्षापासून थकीत असलेली वसुलीची रक्कम वसुल करावी लागणार नाही. कर्जमाफीचा फायदा जिल्हा मध्यवर्ती बँका, सेवा सहकारी संस्था आणि सभासदांना होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका, सेवा सहकारी संथांना फायदा, सभासद कर्जातून मुक्त होतील. शेतकऱ्यांबरोबर बँकाही सक्षम होतील.शेतकऱ्यांवर असलेले कर्ज वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने लावून त्यांच्या घरी जावे लागत होते. परंतु कर्जमुक्ती झाल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाच्या वसुलीचा मोठा त्रास कमी झाला आहे.विलाश वासनिकव्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया.