शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वेतन कपातीचा मिळणार लेखा-जोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:09 IST

अंशदायी सेवानिवृत्ती योजनेंतर्गत महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या रकमेचा लेखा-जोखा कर्मचाऱ्यांना देण्यात यावा असे आदेश वित्त विभागाने काढले आहेत.

ठळक मुद्देवित्त विभागाने काढले आदेश : आ. अग्रवाल यांनी घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अंशदायी सेवानिवृत्ती योजनेंतर्गत महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या रकमेचा लेखा-जोखा कर्मचाऱ्यांना देण्यात यावा असे आदेश वित्त विभागाने काढले आहेत. त्यामुळे महसूल कर्मचाºयांना त्यांच्या वेतनातील कपातीचा पूर्ण लोखा-जोखा आता मिळणार आहे. विशेष म्हणजे, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी वित्त व महसूल विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन त्यांना याबाबत निर्देश दिले होते.सन २००५ पासून महसूल विभागात नोकरीवर लागलेल्या कर्मचाºयांना अंशदायी सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. यांतर्गत कर्मचाºयांच्या वेतनातून १० टक्के रक्कम कपात करून त्यात शासनाकडून १० टक्के रक्कम जोडून कर्मचाºयांच्या सेवानिवृत्त खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात केली जात आहे. मात्र त्यात शासनाकडून तेवढीच रक्कम जोडण्यात आली की नाही, रक्कम कोणत्या विभागाच्या कोणत्या खात्यात जमा आहे. प्रत्येक कर्मचाºयांच्या खात्यात अंशदायी सेवानिवृत्ती योजनेचे किती रूपये जमा आहे याबाबत काहीच माहिती किंवा विवरण विभाग व कर्मचाऱ्यांकडे नाही. यावर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनतर्फे आमदार अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले होते.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी संघटनेच्या पदाधिकाºयांना याबाबत संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, अग्रवाल यांनी, लोकलेखा समितीच्या विधानभवनातील (मुंबई) कार्यालयात वित्त विभागाचे उपसचिव अनुदिप दिघे व महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. याप्रसंगी महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापण्यात आलेल्या रकमेचा स्पष्ट लेखा-जोखा तयार करून नियमानुसार शासनाच्या रकमेचा हिस्सा त्यात जोडून कर्मचाºयांच्या सेवानिवृत्ती खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले. वित्त विभागाचे उपसचिव दिघे यांनी महसूल कर्मचाºयांच्या अंशदायी सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या कार्यपद्धतीत त्वरीत दुरूस्ती करणे व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासंबंधात सर्व विवरण कोषागार अधिकाऱ्यांना त्वरीत तयार करून माहिती व संवितरण अधिकाºयांना उपलब्ध करुन देण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे आता या कर्मचाºयांना त्यांच्या वेतनातील कपात केलेल्या रकमेचा संपूर्ण लेखा-जोखाच आता उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल