शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

वडेगावला आदर्श करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:18 IST

वडेगाव सुंदर झाले पाहिजे ही ग्रामस्थ व माझी इच्छा आहे. लोकप्रतिनिधी चांगले असले तर गावाच्या विकासाला गती मिळते. केवळ विकासकामे न करता गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या .....

ठळक मुद्देराजकुमार बडोले : आमदार आदर्श ग्राम योजनेला सुरूवात

ऑनलाईन लोकमतगोंदिया : वडेगाव सुंदर झाले पाहिजे ही ग्रामस्थ व माझी इच्छा आहे. लोकप्रतिनिधी चांगले असले तर गावाच्या विकासाला गती मिळते. केवळ विकासकामे न करता गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी काम करून वडेगावला आदर्श करणार, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.सडक-अर्जुनी तालुक्यातील वडेगाव-सडक येथे आमदार आदर्श ग्राम योजनेला पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते २८ मार्च रोजी फलकाचे अनावरण करून करण्यात आला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती गिरिधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जि.प. सदस्य शीला चव्हाण, माधुरी पाथोडे, माजी पं.स. सभापती कविता रंगारी, पद्मा परतेकी, भाजपा तालुका अध्यक्ष विजय बिसेन, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सरपंच हेमराज खोटेले, उपसरपंच छाया डोये यांची उपस्थिती होती.बडोले पुढे म्हणाले, गावातील तरूण एकत्र आले तर गावाच्या विकासाला गती मिळून गावाचा विकास नक्की होईल. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेवून गावाच्या विकासाचे नियोजन करावे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा आदर्श पुढे ठेवून ग्रामस्थांनी ग्रामविकासासाठी प्रयत्न केले तर विकासाला गती मिळेल. आदर्श गाव निर्मितीसाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.हत्तीमारे म्हणाले, वडेगाव हे गाव पालकमंत्र्यांनी दत्तक घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. गाव दत्तक घेतल्यामुळे वडेगावच्या विकासाला गती मिळेल. गावातील मुख्य समस्यांकडे ग्रामस्थांनी लक्ष देवून त्या सोडविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा. ग्रामस्थांनी सहकार्य केले तर गाव नक्कीच आदर्श होईल, असे त्यांनी सांगितले.कठाणे म्हणाले, वडेगाव हे गाव आमदार आदर्श ग्राम योजनेत घेण्यात आले आहे. वडेगावचे पालकत्व पालकमंत्र्यांनी स्वीकारल्यामुळे या गावाच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.कार्यक्र माला ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ब्राम्हणकर, सुरेश भेंडारकर, संजय मेंढे, अनिता मेंढे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक विठ्ठलराव कठाणे, बळीराम मेंढे, देवराव मुनिश्वर, श्रीमत मुनिश्वर, बाबुराव मेंढे, कंठीजी ब्राम्हणकर, वामन मुनिश्वर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरूवातीला पालकमंत्री बडोले यांनी वडेगाव-सडक प्रवेशद्वाराजवळ आमदार आदर्श ग्राम योजनेच्या फलकाचे अनावरण केले. यानिमित्ताने सदर कार्यक्र मात त्यांच्या वाढिदवसानिमित्त केक कापला. प्रास्ताविक सरपंच हेमराज खोटेले यांनी केले. संचालन गिरीपाल फुले यांनी केले. आभार मुख्याध्यापक देशमुख यांनी मानले.