शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार राजा झाला हुशार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:35 IST

निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचणे शक्य नसते. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यावर दिली आहे़ यामुळे प्रत्येकजण जबाबदारीने जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. याचा नेमका फायदा मतदार घेत असून या धामधुमीत कार्यकर्त्याची फिरकी घेणाऱ्यांचे फुल मनोरंजन चौका चौकांत पहावयास मिळत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचणे शक्य नसते. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यावर दिली आहे़ यामुळे प्रत्येकजण जबाबदारीने जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. याचा नेमका फायदा मतदार घेत असून या धामधुमीत कार्यकर्त्याची फिरकी घेणाऱ्यांचे फुल मनोरंजन चौका चौकांत पहावयास मिळत आहे़यात हुशारकी मारणारे कार्यकर्त्यावर तोंडसुख घेऊन पाच वर्षात एकदा आलेली संधी म्हणून यथेच्छ ताव मारणारे तरुणांबरोबर वृद्धही आपला टाईमपास करवून घेताना दिसत आहेत. यामुळे प्रचार करणारा कार्यकर्त्यापेक्षा मतदारराजा हुशार असल्याचे चित्र आहे. एकंदरीत यावेळी जागरूक मतदार सर्व अंदाज फोल ठरवतील, यात शंका नाही़ प्रचार कामात व्यस्त अनेकजण प्रचार करताना सरळ सरळ आमच्या पक्षाला मतदान करा म्हणून सांगतात आपण काही इतरापेक्षा वेगळे व मजबूत कार्यकर्ता म्हणून प्रचार करणारे हुशारकी मारत मतदाराचा अंदाज घेताना घुमून फिरून विचारतात़ ‘काय भाऊ, काका, काकी कसे काय सुरू आहे़’?आपला भाऊ काय म्हणतो, पोजिशन कशी आहे, माहोल बरोबर आहे की नाही, या घाईगर्दीत आपला उमेदवार प्रचंड मताने येणार सांगायला विसरत नाही़याउलट आपण पुर्ण मताचा गठ्ठा पलटवला म्हणून सांगतो़ तेव्हा याउलट काही हुशार मतदारांचा कौल घेण्यासाठी मतदारांना सरळ विचारतो, कुणाला मतदान करून गा़ मतदार त्याला ओळखून असतो़ तु म्हणशील त्याला करून, लगेच त्याची छाती फुगते़ या फुगाफुगीत पटकन मजा घेणाऱ्याची प्रश्नांची सरबतीही सुरू होते़ मात्र काही विचारू नका तास दोन तास कसे निघून जातात कळतच नाही़ लगेच हातातील मोबाईलवर वेळ पाहून मजा घेणारे एक एक सरकतात व चर्चा संपली की व्यवस्थेला लागतात़निवडणुका संपल्या की कोण नेता, कुठला कार्यकर्ता व कोण काय असा अनुभव मतदारांना आहे़ यात पक्ष सर्व एकसारखे असतात असा समज मतदाराचा झाला आहे़ यामुळे निवडणुकीच्या काळात गल्ली गल्ली फिरणाºया कार्यकर्त्यांना टारगेट करून त्यांची फिरकी घेणाºयाची संख्या जास्त आहे़ यात हुशारकी मारणाºया व समोर-समोर करणाºया कार्यकर्त्याची गोची करून टिंंगल उडवणाºयाचे गट ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.