शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सिंदीबिरी गावाला देशातील तीन वैज्ञानिकांची भेट

By admin | Updated: February 12, 2017 00:33 IST

तालुक्यातील आदिवासी, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आयएसओ मानांकीत ग्रामपंचायत जेठभावडाअंतर्गत

जेठभावडा ग्रामपंचायत : गावकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देवरी : तालुक्यातील आदिवासी, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आयएसओ मानांकीत ग्रामपंचायत जेठभावडाअंतर्गत येणाऱ्या सिंदीबिरी या गावाला देशातील तीन प्रमुख वैज्ञानिकांनी भेट दिली. गावात देवरीचे नगरसेवक यादोराव पंचमवार यांनी दिलेल्या जागेवर सुरू करण्यात आलेल्या सातेरी मधमाश्याचे पालन केंद्र व शहद विक्री केंद्राची पाहणी त्यांनी केली. या रोजगारासोबत गट शेतीच्या माध्यमातून या ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या तिन्ही गावातील लोकांकरीता रोजगाराची संधी उपलब्ध करून सर्वांच्या हाताला काम देण्याकरीता सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. सिंदीबीरी गावाला भेट देणाऱ्या वैज्ञानिकामध्ये हरियाणा राज्यातील सेवानिवृत्त मुख्य वैज्ञानिक व हिसार अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीचे डॉ.आय.एस.हुड्डा, बुलडाणा येथील बी किपर्स राजूभाऊ बैरागी आणि पुलगावचे शंकर आत्राम यांचा समावेश होता. त्यांनी सिंदीबीरी येथील मधमाशी पालन व शहद विक्री केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि या गावची प्रगती पाहून जेठभावडा, सिंदीबीरी व मसूरभावडा या तिन्ही गावातील लोकांचे भविष्य आता बदलणार असल्याचे सांगितले. या शहद संकलन व विक्री केंद्रासह येथील लोकांनी जर गट शेतीच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला तर येथील लोकांंना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन यामुळे त्यांचे दिवस अवश्य पलटतील असे ते म्हणाले. सिंदीबीरी गावात महिला उत्पादक संघ कार्यरत असून यात १ हजार महिलांचा समावेश आहे. या ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या सर्व लोकांच्या हाताला काम व रोजगार मिळवून देण्यास येथील सरपंच डॉ.जे.टी.रहांगडाले व सचिव सुमेद बंसोड यांच्या सह संपूर्ण ग्रा.पं.चे सदस्य व गावकऱ्यांनी सुरू केलेल्या या कार्याला देशात वेगळे स्थान निर्माण करुन देण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही या तिन्ही वैज्ञानिकांनी दिली. याभेटीदरम्यान सरपंच डॉ.जे.टी.रहांगडाले, उपसरपंच भोजराज गावळकर, सचिव सुमेद बंसोड, तलाठी राजू उपरीकर, देवरीचे नगरसेवक यादोराव पंचमवार, शेषराव किरसान, यादोराव कुंजाम, संजय साखरे आणि सर्व ग्रा.पं.सदस्यांसह गावातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार पोलीस पाटील राजू गावळकर यांनी मानले.(प्रतिनिधी)