शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.आंबेडकर रोपवाटिकेला उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट

By admin | Updated: October 22, 2016 00:37 IST

स्थानिक अर्जुनी मोरगाव रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागामार्फत साकारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेला

एक लाख रोपांची निर्मिती : दोन हेक्टर जागेत विस्तारबोंडगावदेवी : स्थानिक अर्जुनी मोरगाव रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागामार्फत साकारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेला उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.बी. शिंदे यांनी भेट दिली. रोमहर्षक फुललेल्या रोपवाटिकेला पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने अर्जुनी मोरगाव ते सानगडी रस्त्याच्या अगदी दर्शनी भागात दोन हेक्टर जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेची निर्मिती मागील सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलीे. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक प्रविणकुमार बडगे यांच्या यशस्वी मार्गदर्शनातून प्रभारी सहायक लागवड अधिकारी एल.बी. लांजेवार नवनिर्मित रोपवाटिका फुलविण्याचे काम नियोजन बद्ध करीत आहेत. एकूण दोन हेक्टर जागेत विस्तार असलेल्या रोपवाटिकेत १ हेक्टर जागेमध्ये ३६ प्रजातींच्या झाडांची एक लाख रोपांची निर्मिती केली जात आहे . सहा महिन्यांत रोपांची झालेली वाढ डोळ्यातील पारणे फेडत आहे. मुख्य रस्त्यालगत नाना प्रकारची रोपे फुलून दिसत असल्याने ये-जा करणाऱ्यांना आल्हाददायक वातावरण निर्मितीची निश्चितच प्रचिती येते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.बी. शिंदे यांनी रोपवाटिकेला भेट दिली. विस्तीर्ण अशा जागेत पसरलेल्या रोपवाटिकेचे मोठ्या बारकाईने निरीक्षण केले. स्वत: बीज संकलन करुन विविध प्रजातीच्या रोपांची निर्मिती केली जात असल्याचे उप जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. रोजगार हमी योजनेंतर्गत रोपवाटिकेचे काम केले जात आहे. प्रभारी सहाय्यक लागवड अधिकारी एल.बी. लांजेवार यांनी १५ मजुरांच्या सहाय्याने एक़ लाख रोपांची निर्मिती केली. यात मोठ्या झाडांचा जास्त समावेश असल्याची माहिती लांजेवार यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली. उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी रोपवाटिकेतील रोपांची झालेली लक्षणिय वाढ, नियोजनबद्ध बेड निर्मिती, विविध जातींचे झाडे पाहून उपजिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केला. अल्पावधीतच भरभराटीस आलेल्या रोपवाटिकेची त्यांनी प्रशंसा केली. (वार्ताहर)