सालेकसा : बिंझली येथील मायलेकी पुरात वाहून गेल्याची बातमी आणि लोकप्रतिनिधीकडून उपेक्षा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ला वाचताच जिल्हा परिषदेतचे समाजकल्याण सभापती व संबंधित क्षेत्राचे जि.प. सदस्य देवराज वडगाये यांनी पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. पुरात जीवंत वाचविण्यात आलेली मुलगी जयश्री बिलोनेला आपल्याकडून पाच हजाराची मदत दिली. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी पाठपुरावा करण्याची हमीसुद्धा त्यांनी दिली. ही समस्या उचलून धरल्याबद्दल लोकमतचे आभार व्यक्त केले. बिंझली येथील सरपंच सुलोचना लिल्हारे यांच्या हस्ते वडगाये यांच्याकडून पाच हजार रुपये जयश्रीला देण्यात आले. यावेळी माजी पं.स.सभापती बाबुलाल उपराडे, रिबीलाल लिल्हारे, धनुकलाल लिल्हारे व इतर मान्यवर उपस्थित होते. १८ सप्टेंबरला बिंझली येथील भुमेश्वरी बाबुलाल बिलोने ही आपल्या दोन जुळ्या मुलींना घेऊन नदी पार करताना पुरात वाहून गेली होती. विजय ढेकवार या युवकाने जयश्रीला वाचविले. तर भुमेश्वरी आणि भाग्यश्रीला वाचविण्यात यश आले नाही. (प्रतिनिधी)
सभापतीनी दिली ‘त्या’ कुटुंबाला भेट
By admin | Updated: September 25, 2015 02:24 IST