शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:36 IST

शहरामध्ये वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसामान्य पादचाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरामध्ये वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसामान्य पादचाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चौकांमध्ये डोळयात धुळफेक करत असे प्रकार सर्रास सुरू असून वेगाने वाहच चालविण्यामुळे रस्त्यावरील सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिसांनी अभियान राबवून भरधाव वाहनचालकांना आळा घालत वाहतुकीचे नियमाची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून हो लागली आहे.दुचाकीवर दोनच जणांनी प्रवास करावा, असा नियम घालून देण्यात आला आहे. शिवाय शहरामध्ये दुचाकी चालविताना वेग नियंत्रित असणे गरजेचे आहे. मात्र चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची ऐसीतैसी केली जात आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसोबत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळेत जाणाऱ्या मिसरुडही न फुटलेल्या वाहनचालकांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे रस्त्याने चालणाऱ्यांना थोडा विचार करूनच पुढे जावे लागत आहे. वाहतूक शाखेकडून वेळोवेळी मोहीम राबवून तसेच चौकांमध्ये कर्तव्य बजावताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तथापी, बरेचदा पोलिसांच्या कारवाईलाही न जुमानता हा प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक अडचणीत येतात. या प्रकारकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मोटारसायकलवर दोनच जणांनी प्रवास करावा, असा नियम घालून देण्यात आला आहे.शिवाय शहरामध्ये मोटारसायकल चालविताना वेग नियंत्रित असणे गरजेचे अहे. मात्र दुचाकी चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची ऐसीतैशी होत असल्याचे दिसते. त्यामुळे पादचाऱ्यांसोबत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी