शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांनी सोपविल्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे चाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 21:59 IST

ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे२० दिवसांपासून आंदोलन सुरूच : दखल न घेतल्याने रोष, ग्रामपंचायतची कामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यभरातील २२ हजार ग्रामसेवकांनी त्यांच्या प्रलबिंत मागण्यांना ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. मात्र तब्बल २० दिवसानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने सर्व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायच्या चाव्या आणि शिक्के खंडविकास अधिकाऱ्यांकडे सोपविल्या.त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.शासन आंदोलनाची दखल न घेतल्याने २२ आॅगस्टपासून सर्व ग्रामसेवकांनी नाईलाजास्तव ग्रामपंचायतमधील अभिलेखाच्या चाव्या आणि शिक्के खंडविकास अधिकाºयांकडे जमा करुन आंदोलन अधिक तीव्र केले आहे.यामुळे ग्रामपंचायतची सर्वच कामे ठप्प पडली आहे.गावकºयांचा विविध कामासाठी ग्रामपंचायतशी संपर्क येतो.तसेच विविध दाखले, टॅक्स भरणे आदी कामासाठी ग्रामपंचायमध्ये जावे लागते. मात्र ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ही सर्व कामे खोळंबली असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.गावात विकासात्मक कामांची अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामसेवक करीत असतात. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे ही कामे सुध्दा रखडली आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात केव्हाही जाहीर होऊ शकते.त्यामुळे आचारसंहितेपूर्वी विकास कामांना मंजुरी, थकीत देयके मार्गी लावणे यासह अन्य कामे पूर्ण करुन घेणे गरजेचे आहे.अन्यथा ही कामे अधिक लांबण्याची शक्यता असते. मागील २० दिवसांपासून ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू असून शासनाने त्याची कुठलीच दखल घेतली नसल्याने याचा फटका मात्र गावकºयांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत