शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखाना वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:37 IST

ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या पशुंवर वेळीच उपचाराची सोय व्हावी. यासाठी शासनाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले. मात्र सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे.

ठळक मुद्देरिक्तपदांचा अभाव : औषधांचा तुटवडा, पशुपालकांना आर्थिक भूर्दंड, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या पशुंवर वेळीच उपचाराची सोय व्हावी. यासाठी शासनाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले. मात्र सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. तर औषधांचा सुध्दा अभाव असल्याने हा दवाखाना केवळ नाममात्र ठरत आहे.येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शासनाने २०१२-१३ मध्ये सर्वोत्कृष्ठ कार्य पुरस्कार तर २०१४ मध्ये राज्य पुरस्काराने सम्मानित केले. मात्र यानंतरही सध्या पशुपालकांना येथे वैद्यकीय अधिकारी व औषधे उपलब्ध राहत नसल्याने विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे पशुपालकांना खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागत आहे. परिणामी गोरगरीब पशुपालकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात कार्यरत पी.पी. मारगाये यांची पाच महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांनतर त्यांचा चार्ज पर्यक्षेकाकडे देण्यात आला. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनही ते येथे रूजू झाले नाही. त्यामुळे येथे जनावरांना उपचारासाठी घेऊन येणाºया पशुपालकांची गैरसोय होत आहे. शेंडा कोयलारी येथे कार्यरत नरेश कुंभारे पशुधन पर्यवेक्षक यांना पी.पी. मारगाये सेवानिवृत्त झाल्यानंतर सौंदड येथील दवाखान्याचे अतिरिक्त प्रभार देण्यात आला. शेंडा कोयलारी परिसरातील १० गावे त्यांच्याकडे असल्यामुळे सौंदड येथे ते आठवड्यात केवळ तीन दिवस येतात. सौंदड, राका पिपरी, पळसगाव, सावंगी, ब्राम्हणी, बोपाबोडी, फुटाळा, भद्दयाटोला, श्रीरामनगर अशी दहा गावे असून जवळपास ६५०० अशी जनावरांची संख्या आहे. या भागातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. त्यामुळे पशुंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.रिक्त पदांची परांपरा कायमगोंदिया जिल्हाची स्थापन झाली तेव्हापासून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहे. ही पदे अद्यापही भरण्यात आली नाही. जिल्ह्यात एकूण ७२ दवाखाने आहेत. त्यात २९ दवाखान्यामध्ये पदे रिक्त आहेत. परिणामी एका डॉक्टरवर दोन दवाखान्याचा भार आहे. पशुधन विकास अधिकारी २२ पदे तर पशुधन पर्यवेक्षकाची ७ पदे रिक्त आहेत.पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी औषध साठा उपलब्ध झाला आहे. त्याचे वाटप लवकर पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाईल. सौंदड येथे डॉ. रोशन आंदेशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पण काही अडचणीमुळे सध्या त्यांची जिल्ह्याच्या ठिकाणी नियुक्ती केली आहे.- डॉ.राजेश वासनिकजिल्हा पशुधन विकास अधिकारी.