शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भलतंच! लोको पायलटचा गाडी पुढे नेण्यास चक्क नकार; बल्लारशा-गोंदिया गाडी पाच तास रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2023 21:27 IST

Gondia News गुरुवारी बल्लारशाहून गोंदियाकडे सकाळी येणारी गाडी तब्बल पाच तास उशीराने हिरडामाली रेल्वे स्थानकावर रात्री ७: ३० वाजता पोहचली. दरम्यान लोकोपायलटने या रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढे नेण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता.

अंकुश गुंडावारगोंदिया : गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पुर्णपणे ढासळले आहे. याच प्रकाराला कंटाळून गुरुवारी (दि.२०) सकाळी नवेगावबांध (देवलगाव) रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर उतरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर गुरुवारी बल्लारशाहून गोंदियाकडे सकाळी येणारी गाडी तब्बल पाच तास उशीराने हिरडामाली रेल्वे स्थानकावर रात्री ७: ३० वाजता पोहचली. दरम्यान लोकोपायलटने या रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढे नेण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता.

रेल्वे गाड्यांना दररोज विलंब होत आहे. मालगाड्यांसाठी प्रवासी गाड्यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे या प्रकाराने आता प्रवाशांसह लोकाेपायलट सुध्दा त्रस्त झाले असल्याचा अनुभव गुरुवारी जिल्हावासीयांना आला. बल्लारशाहून गोंदियाला येणारी पँसेजर गाडी ही तब्बल पाच तास उशीराने धावली. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागला.

दरम्यान गाडी हिरडामाली रेल्वे स्थानकावर रात्री ७.३० वाजताच्या सुमारास पोहचल्यानंतर त्या ठिकाणी एक तास उभी ठेवण्यात आली. त्यानंतर गाडीच्या लोकोपायलटने गाडी पुढे नेण्यास नकार दिला. तो आपल्या मागणीवर अडून बसला होता. त्यामुळे प्रवाशांना हिरडामाली स्थानकावर मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा लोकाेपायलटची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर लोकोपायलट तयार झाला. ही गाडी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहचली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे