शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकला धडकला ट्रक

By admin | Updated: February 13, 2017 00:19 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अर्बन बँकेसमोर उभ्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने मागून धडक दिली.

चालक व वाहक गंभीर : दोघांना नागपूरला हलविले देवरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अर्बन बँकेसमोर उभ्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने मागून धडक दिली. रविवारी (दि.१२) पहाटे ४ वाजता दरम्यान हा अपघात घडला असून यात ट्रक चालक व वाहक दोघे गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकलेल्या वाहकाला क्रेनच्या मदतीने बाहेर काढून दोघांना नागपूरला हलविण्यात आले. सविस्तर असे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने नागपूर वरून दुर्ग (छत्तीसगड) कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ४९/१०५० ने अर्बन बँकेसमोर उभ्या ट्रक क्रमांक एमएच ४९/५३९ ला भरधाव वेगात मागून धडक दिली. रविवारी (दि.१२) पहाटे ४ वाजता दरम्यान घडलेला हा अपघात इतका जबर होता की, यात ट्रक क्रमांक एमएच ४९/१०५० चे कॅबीन चंदामेंदा झाले. एवढेच नव्हे तर चालक रामजी बतीरायाम शाहू (४०,रा.शिवारीटोला, छुरीया) व वाहक चैनसिंग भारत नेताम (२२,रा.गोपालपूर,छुरीया) हे दोघे गंभीर जखमी झाले व वाहक चैनसिंग केबीनमध्ये अडक ला. सकाळी ६ वाजता दरम्यान ही बातमी परसली व नगरसेवक रितेश अग्रवाल, राष्ट्रवादी ट्रांसपोर्ट आघाडीचे अध्यत्र कक्के भाटीया, सामाजीक कार्यकर्ता वड्डू भाटीया, पोलीस कर्मचारी प्रकाश गायधने व लांडगे यांनी कर्मचारी व क्रेनच्या मदतीने वाहक चैनसिंग याला बाहेर काढले. दोघांना येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना नागपूरला हलविण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून तपास ठाणेदार राजेश तटकरे करीत आहेत.