शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

पं.स.सदस्याची पाण्याच्या टाकीवरून वीरूगिरी

By admin | Updated: May 12, 2017 01:16 IST

जिल्हा परिषद हायस्कूलच्या इमारत दुरुस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून चौकशीची तकार करूनही काहीच झाले नाही.

भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी : पोलिसांच्या मध्यस्थीनंतर उतरले खाली लोकमत न्यूज नेटवर्क एकोडी : जिल्हा परिषद हायस्कूलच्या इमारत दुरुस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून चौकशीची तकार करूनही काहीच झाले नाही. प्रकरणी दिलेल्या इशाऱ्यानुसार पंचायत समिती सदस्य जयप्रकाश बिसेन यांनी गावातील पाणी टाकीवर चढून विरूगिरी करीत उडी घेऊन जीव देण्याचा इशारा दिला. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. येथील जुन्या जीर्ण इमारती करिता जि.प. बांधकाम विभागाकडून १५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला गेला असून या कामाच्या दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतकडे देण्यात आले. परंतु हे काम पूर्णत्वास आले असून या कामात मंजूर निकषाप्रमाणे काम न करता जुन्या इमारती मधला लाकूड फाटा मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आला असे पं.स. सदस्य बिसेन म्हणने आहे. लावण्यात आलेले लाकूड हा सन १९५५ मध्ये तयार करण्यात आलेल्या इमारतीचे असून हेच लाकूड दुरुस्तीनंतरही वापरण्यात आल्याचे निदर्शनास येते. या प्रकरणाची अनेकवेळा जिल्हा परिषद बांधकाम अभियंता शुक्ला व इतर अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र काम पूर्णत्वास येऊनही कोणत्याच प्रकारची चौकशी न करता देयक देण्याच्या तयारीला जि.प. बांधकाम विभाग लागला होता. या कारणामुळे १९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, पंचायत समिती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशा अनेक ठिकाणी तक्रार करुन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणाची चौकशी न झाल्यास जि.प. शाळेच्या प्रांगणात असलेल्या पाणी टाकी वरुन उडी घेऊन जीव देण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ९ तारखेपर्यंत प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याचे पाहून बुधवारी (दि.१०) सकाळी ६ वाजताच्या सुमारास गंगाझरी पोलीसांना चकमा देत बिसेन यांनी मोठ्या पाणी टाकीवर चढाई केली. सकाळी ६ वाजताचे प्रकरण असताना ही हळूहळू लोकंची गर्दी वाढू लागली. हा सर्व प्रकार लक्षात घेता पोलिसांनी पं.स.सदस्याची मोठ्याने समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत या कामाची चौकशी व दोषींवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत पाणी टाकीवरून न उतरण्याचा हट्ट बिसेन यांनी धरला. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या आश्वासनाला होकार देत पाणी टाकीवरुन उतरण्यास होकार दिला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिरोडा येथील प्रभारी उफ विभागीय पोलीस अधिकारी आर.एस. बरकते यांच्या मार्गदर्शनात गंगाझरी निरीक्षक सुनील उईके यांना योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून बिसेन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेला पोलीसच जबाबदार- अंबुले पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे बिसेन पाणी टाकीवर जाऊन पोहचले. त्यामुळे घटनेला पोलीसच जबाबदार असल्याचे जि.प.सदस्य रमेश अंबुले यांनी सांगीतले. तर अभियंता शुक्ला यांनी पोलीसांसमक्ष दिलेल्या बयानात काम ग्रामपंचायत करीत असून कोणत्या कंत्राटदाराच्या माध्यमातून केले जात आहे याचे उत्तर देण्यास टाळले. काम जवळपास पूर्ण होत आले असून पूर्ण चौकशी झाल्यानंतरच दिलेलया अटी व शर्तीनुसार देयक काढण्यात येतील असे सांगीतले.