वाफ्यांची हिरवळ : पावसाची चाहूल लागताच सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात वाफे टाकले आहेत; मात्र पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी वाफे आता करपू लागले आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी दिल्यामुळे वाफे असे हिरवेगार दिसू लागले आहेत. मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांचे मात्र नुकसानच आहे. पाऊस कधी बरसतो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
वाफ्यांची हिरवळ :
By admin | Updated: June 30, 2017 01:28 IST