शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

वनग्राम गावांचे स्वप्न भंगले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:26 IST

महसूल विभागाच्या धर्तीवर राज्यातील वन क्षेत्रालगतच्या गावांना टप्पा टप्यात ग्रामपंचायतीच्या सहमतीने महसूल हक्कांना बाधा न पोहोचविता वनग्राम निर्माण करण्याचा संकल्प वनविभागाने केला होता.

ठळक मुद्देविकास कामांचा अभाव : अंमलबजावणी नाही, आराखडा कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : महसूल विभागाच्या धर्तीवर राज्यातील वन क्षेत्रालगतच्या गावांना टप्पा टप्यात ग्रामपंचायतीच्या सहमतीने महसूल हक्कांना बाधा न पोहोचविता वनग्राम निर्माण करण्याचा संकल्प वनविभागाने केला होता. या माध्यमातून काही प्रमाणात गावांचा विकास होण्यास चालना मिळाली. यासाठी वनग्राम समितीची स्थापन करण्यात आली. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने वनग्राम गावांचा विकास रखडला असून गावकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे.स्वातंत्र्यानंतर वनग्राम गावांना महसूली गावांचा दर्जा दिल्याने विभागाचे गावावरील हक्क कमी झाले. अलीकडच्या काळात वनावरील साधन संपत्तीवर गावकरी हक्क दाखवित आहेत. वनविभाग गावकºयांच्या सहकार्याने वन व्यवस्थापन व वनांवर आधारित रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार होते. त्यासाठी १५ हजार गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या वन विभागाला मदत करीेत आहे. वन्यजीव, जंगलांना आग लागणे, अवैध चराईचे प्रमाण कमी झाले. १९७२ मध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील वनग्राम थाडेझरी नागझिरा अभयारण्यात येत असल्याने या गावाचे पुनवर्सन करण्यात आले. पण, अद्यापही थाडेझरी गावाचा विकास झाला नाही. वनविभागाने वनग्राम निर्माण करताना १९९६-९७ पूर्वीची स्थिती होती ती कायम ठेवायला पाहिजे होती.शासनाने राखीव वन घोषित करताना जनभावनांचा विचार करायला पाहिजे होता. मात्र अधिकाºयांनी कोणत्याही ग्रामपंचायतकडून ग्रामपंचायतचा ठराव न मागविता राखीव वन घोषित केले. परिणामी अनेक गावांचा विकास रखडला. कोसमतोंडीवरुन अर्धा कि.मी. अंतरावर नागझिरा अभयारण्याची सीमा आहे. नागझिरा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प घोषित झाले. कोसमतोंडीवरुन थाडेझरी तीन कि.मी.अंतरावर असून या गावाचा कोसमतोंडी गट ग्रामपंचायतमध्ये समावेश आहे. थाडेझरीपासून व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याची गरज होती. मात्र कोसमतोंडी सीमेवरुन घोषित केल्याने चिचटोला, मुंडीपार (ई), बेहळीटोला, हेटी, गिरोला, धानोरी, मालीजुंगा, लेंडेझरी, मुरपार या गावातील शेतकऱ्यांवर गुरे चारण्यासाठी वनविभाग मनाई करीत आहे. अनेकवेळा २५-३० कि.मी. अंतरावरील कोंडवाड्यात जनावरे नेण्यात येतात. गावालगतचे जंगल हे वनग्राम समितीच्या ताब्यात दिल्यानंतर त्या ठिकाणची वनसमिती संपुष्टात आली.वनविभागाने वनग्रामसाठी दहा वर्षाचा कृती आराखडा तयार केला. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. मोहा, बांबू या माध्यमातून गावकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाईल असे स्वप्न गावकऱ्यांना दाखविण्यात आले. मात्र अद्यापही रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला नाही.वनक्षेत्रात वाढ करण्याचा उद्देशगावालगतचे जंगल हे वनग्राम समितीच्या ताब्यात दिल्यानंतर त्या ठिकाणची वन समिती संपुष्टात आली. त्या गावाला वनग्रामचा दर्जा मिळाल्याने तर गावकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना वनविभाग राबवितो. यासाठी वने व जिल्हा प्रशासनाकडून निधी दिला जातो. वनांवर आधारित रोजगार उपलब्ध करुन दिले जाते. त्या बदल्यात वनांची वाढ होण्यासाठी मदत करणे हा या मागील हेतू आहे.दहा वर्षाचा कृती आराखडा कागदावरज्या गावांना वनग्राम योजनेत सहभागी व्हायचे आहे. त्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये तसा ठराव मंजूर करुन ग्रामपंचायत कायदा (३) सन १९५९ नुसार वनग्राम घोषित करण्यापूर्वी अधिसूचना जारी करुन वनव्यवस्थापन नैसर्गिक साधन संपत्तीचा सारासार विचार व त्यावरील ग्रामस्थांचे हक्क, जबाबदारी निश्चित केली जाते. गावाचा सर्वांगिन विकास करण्यासाठी दहा वर्षाचा कृती आराखडा आधीच तयार करुन निधी देण्याचे नियोजनही केले जाते. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने वनग्रामचा विकास खुंटला आहे.