नागपूर विभागात जिल्हा टॉप : ८९.७३ टक्के निकाल, ग्रामीण शाळाही निकालात अव्वलगोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यावर्षी ८९.७३ टक्के निकाल देऊन गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. आमगावच्या आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे हिने ९७.२० गुण घेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. त्यापाठोपाठ गोंदियातील विवेक मंदिर शाळेचा श्रेयस वैद्य याने ९६.६० गुणांसह द्वितीय क्रमांक घेतला, तर तृतीय क्रमांकावर तिघांनी बाजी मारली. देवरी येथील मनोहरभाई पटेल हायस्कूलची प्रांजल तृपराज राऊत, विवेक मंदिरची ख्याती पलन आणि गुजराती राष्ट्रीय स्कूल गोंदियाची भाग्यश्री रंभाडे यांनी प्रत्येकी ९६.२० गुण पटकावले आहेत. जिल्ह्यातील २३ हजार ५३७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २१ हजार १२० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यातील ३३८३ विद्यार्थी प्रावीण्य सूचित आले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालाबाबत विद्यार्ध्यांमध्ये सकाळपासून उत्सुकता होती. यावर्षी पुन्हा एकदा जिल्ह्याने नागपूर विभागात चांगला निकाल दिल्याने शैक्षणिक वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे १०० टक्के निकाल देणाऱ्या ३३ शाळांमध्ये काही आश्रमशाळांचाही समावेश आहे.एकूण २१ हजार १२० विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील २३ हार ५५८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नामांकन दाखल केले होते. त्यातील २३ हजार ५३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ३३८३ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य सूचित स्थान पटकावले. प्रथम श्रेणीत ८५१८, द्वितीय श्रेणीत ७६३१ तर १५८८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यावर्षी पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारत मुलांना मागे टाकले. यावर्षी ११ हजार ८४० विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यापैकी १० हजार ८९० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यात. त्यांची टक्केवआरी ९१.९८ आहे. तर ११ हजार ६९७ मुलांपैकी १० हजार २३० मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे प्रमाण ८७.४६ टक्के आहे. (जिल्हा प्रतिनिधी)डॉक्टर बनून समाजाची सेवा करायची आहे- वैष्णवी४वैष्णवी शेंडे हिच्या या यशात आदर्श विद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ज्याप्रमाणे वाटा आहे त्याप्रमाणे तिगाव येथील शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील अशोक शेंडे, गृहिणी असलेली आई आणि आजी-आजोबांचे मार्गदर्शन यांचाही मोठा वाटा आहे. आजी-आजोबांनी तिला नैतिकतेचे जे धडे दिले त्यामुळे तिला अभ्यासात मन एकाग्र करण्यास खूप मदत झाली. दररोज ५-६ तास नियमित अभ्यास करणाऱ्या वैष्ववीला डॉक्टर बनण्याची इच्छा असल्याचे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दिल्लीतील एम्स या वैद्यकीय शिक्षण संस्थेतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा तिने बोलून दाखविली. आपल्या यशाचे श्रेय तिने प्राचार्य, शिक्षकवृंद, आई-वडिल, भाऊ, आजी-आजोबांना दिले.नावाप्रमाणेच ‘आदर्श’ असणारे आमगावचे आदर्श विद्यालय४केवळ शहरातील महागडी फी आकारून प्रवेश देणाऱ्या आणि भपकेबाजपणा करणाऱ्या शाळांमधीलच विद्यार्थी गुणवंत असतात हा गैरसमज जिल्ह्यातून पहिल्या आलेल्या वैष्णवीने मोडून काढला. आमगावसारख्या ग्रामीण भागात असूनही आपल्या गुणवैशिष्ट्यांनी खरोखरच आदर्श ठरलेल्या आमगावच्या आदर्श विद्यालयाने हा बहुमान यावर्षी पटकाविला याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे मत आमगाव विद्यालयाचे प्राचार्य जी.आर.मच्छिरके यांनी व्यक्त केले. भवभूती शिक्षण संस्थेद्वारा संचालित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची सुसज्ज प्रयोगशाळा, सुविधांनी युक्त ग्रंथालय, शाळेची शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कौशल्याचा विकास करणारे वातावरण यामुळेच आदर्श विद्यालयाने ही गुणवत्ता संपादन केली असल्याचे ते म्हणाले. येथे विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातात. या कामात शाळेचे कार्यवाह केशवराव मानकर (माजी आमदार), अध्यक्ष सुरेशबाबू असाटी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरते. या कार्यात उपाध्यक्ष प्रमोदकुमार कटकवार, उपमुख्याध्यापक एन.के.अंबुले, पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य मोलाचे असते असे प्राचार्य मच्छिरके म्हणाले. (अऊश्ळ)३३ शाळांचा निकाल १०० टक्के१) साकेत पब्लिक स्कूल गोदिया२) विवेक मंदिर हायस्कूल गोंदिया३) श्री गणेशन कॉन्व्हेंट स्कूल गोदिया४) जानकीदेवी चौरागडे हायस्कूल गोंदिया५) प्रोग्रेसिव्ह इंग्लिश हायस्कूल गोंदिया६) मनोहरभाई पटेल सैनिकी शाळा, गोंदिया७) लक्ष्मीबाई टेंभरे हायस्कूल, रायपूर८) श्री राजस्थान इंग्लिश हायस्कूल, गोंदिया९) संस्कार हायस्कूल, गोंदिया१०) चंचलाबेन मनीबाई पटेल इंग्लिश स्कूल गोंदिया११) स्वामी तेऊराम आदर्श इंग्लिश स्कूल, गोंदिया१२) संत जयरामदास विद्यालय, ठाणा१३) स्व.आर.शर्मा हायस्कूल, बोरकन्हार१४) सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव१५) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, इडदा१६) चंद्रभागा विद्यालय, राजोली१७) दिनकर हिंदी हायस्कूल, दिनकरनगर१८) जी.एम.बी.हायस्कूल अर्जुनी मोरगाव१९) न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल, गोंदिया२०) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कडीकसा२१) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पालांदूर (जमी)२२) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पुराडा२३) नवप्रतिभा हायस्कूल, दवडीपार (गोरेगाव)२४) स्व.ब्रिजलालजी कटरे हायस्कूल, शहारवाणी२५) जिल्हा परिषद हायस्कूल, सौंदड२६) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शेंडा२७) ग्राम शिक्षण संस्था माध्यमिक विद्यालय, सडक-अर्जुनी२८) नवजीवन विद्यालय, राका२९) स्व.बनारसीलाल अग्रवाल हायस्कूल, सडक अर्जुनी३०) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बिजेपार३१) ज्ञानदीप आदिवासी विकास हायस्कूल, विचारपूर३२) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोयलारी३३) रविंद्रनाथ टागोर माध्यमिक आश्रमशाळा, मेंढा
‘आदर्श’च्या वैष्णवीने रचला इतिहास
By admin | Updated: June 9, 2015 01:46 IST