शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBSK vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

लसीकरणाचे कामकाज नवख्यांच्या हाती

By admin | Updated: July 6, 2014 23:59 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या मेंदूज्वर लसीकरण मोहेम राबविली जात आहे. १ ते १५ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांसाठी असलेल्या लसीकरणाचे कामकाज मात्र नवख्यांच्या हाती दिसून आले.

माहितीअभावी पालकांची धावपळ : उघड्यावरच सुरू होते लसीकरणगोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या मेंदूज्वर लसीकरण मोहेम राबविली जात आहे. १ ते १५ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांसाठी असलेल्या लसीकरणाचे कामकाज मात्र नवख्यांच्या हाती दिसून आले. शहरातील धोटे सूतिकागृहात तर उघड्यावरच लसीकरण केले जात होते. शिवाय प्रचार व प्रसिद्धीअभावी पालकांची धावपळसुद्धा दिसून आली. मेंदूज्वर हा गंभीर आजार आहे. यापासून चिमुकल्यांची सुरक्षा व्हावी या दृष्टीने सध्या लसीकरणाची विशेष मोहीम राबविली जात आहे. यांतर्गत शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. याशिवाय कधीपासून तर कधीपर्यंत, कोठे, कालावधी याबाबत जनतेला माहितीच नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या लसीकरणाची व्यापक प्रचार व प्रसिद्धीच करण्यात आली नसल्याचे दिसते. शिवाय सदर प्रतिनिधीने शनिवारी शहरातील धोटे सूतिकागृहात जाऊन पाहिले असता तेथे अंगणात उघड्यावरच लसीकरणाचे काम सुरू असल्याचे दिसले. यात दोन मुली लसीकरणासाठी आलेल्यांचे कार्ड भरत होत्या. त्यातही त्यांना धड नावसुद्धा लिहिता येत नसल्याचे दिसले. तर लस लावण्यात येणाऱ्या चिमुकल्यांची पूर्ण माहितीसुद्धा त्यांनी विचारून भरली नसल्याचे आढळले. फक्त आई-वडिलांचे नाव व पत्ता लिहून कार्ड भरले जात होते. शिवाय लस लावणारी एक मुलगी व एक महिला दिसून आली. त्यांनाही पटापट लस लावून आपले काम आटोपण्याची घाई दिसून आली. त्यांना विचारणा केली असता, शनिवार हा शेवटचा दिवस असल्याचे कळले. मेंदुज्वरसारख्या जीवघेण्या आजारावरील लसीकरणाचा कार्यक्रम असताना एखादे होर्डिंग किंवा पत्रक दिसून न आल्याने लसीकरणाची मोहीम ज्या लोकांना माहिती पडली फक्त तेवढ्यांपुरतीच होती असा भास होतो. शाळेत जाऊन लसीकरण केले जात असल्याचे ऐकायला आले. मात्र जी मुले शाळेत जात नाहीत त्यांचे काय, असा सवाल मात्र आता नागरिक करीत आहेत. शिवाय एवढा मोठा व महत्त्वपूर्ण कार्यक्रम शासन राबवीत असला तरी जिल्हा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे सर्वसामान्य जनता मात्र त्यापासून वंचित राहणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. याकडे मात्र लोकप्रतिनिधी व नागरिकांंचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)