शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

9 मार्चपासून होणार प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:30 IST

तालुक्यातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना तालुका अथवा जिल्हास्तरावर पायपीट करावी नाही. जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणासाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी हे तीन दिवस निश्चित केले आहे. केंद्र शासनाने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोरोना लसीकरणास सद्यस्थितीत सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देलसीकरणासाठी तीन दिवस निश्चित : ज्येष्ठ नागरिकांची पायपीट होणार कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या नागरिकांना कोरोना लसीकरणास सुरुवात केली. सुरुवातीला सरकारी आणि जिल्ह्यातील मोजक्याच सहा खासगी रुग्णालयांना लसीकरणाची मंजुरी दिली होती. त्यामुळे या केंद्रावर गर्दी वाढल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास दूर करण्यासाठी आता जिल्ह्यातील एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ९ मार्चपासून कोराेना लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. तालुक्यातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना तालुका अथवा जिल्हास्तरावर पायपीट करावी नाही. जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणासाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी हे तीन दिवस निश्चित केले आहे. केंद्र शासनाने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोरोना लसीकरणास सद्यस्थितीत सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ६० वर्षावरील नागरिकांची संख्या १ लाख ३० हजार आहे तर ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या ५ लाखांवर आहे. लसीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मायक्रो प्लॅन तयार करण्याच्या सूचना केल्या आहे. हा प्लॅन तयार झाल्यानंतर लसीकरणाचा वेग कसा वाढविता येईल या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. तशा सूचना सुध्दा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ९ मार्चपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस घेता येणार आहे. 

शीत साखळी केंद्रासह इतर सुविधांची चाचपणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ९ मार्चपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. लस साठवून ठेवण्यासाठी शीत साखळी केंद्र, दररोज किती जणांना लस द्यायची याचे नियोजन, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती तसेच आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याचे निर्देश सुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस