गोंदिया : जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि.२२) जिल्ह्यातील २५९ कोरोना वॉरिअर्सचे लसीकरण करण्यात आले. याची टक्केवारी ८६.३३ एवढी असून कोरोना लसीकरणामुळे आता कोरोना जाणार हे स्पष्ट दिसून येत आहे.
१६ तारखेपासून अवघ्या देशातच जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून त्यानुसार जिल्ह्यातही लसीकरण केले जात आहे. सर्वप्रथम फ्रंटलाईन कोरोना वॉरिअर्सचे लसीकरण करण्याचे शासनाने आदेश असल्याने कोरोना वॉरिअर्सचे लसीकरण केले जात आहे. या अंतर्गत शुक्रवारी (दि.२२) जिल्ह्यात लसीकरण मोहीम घेण्यात आली व त्यात येथील वैद्यकीय महाविद्यालयात ९८, तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात ९२ तर देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात ६९ वॉरिअर्सचे लसीकरण करण्यात आले आहे. याची ८६.३३ एवढी टक्केवारी आहे.