शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 21408 नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय हाती आहे. अशात शासनाकडून लसीकरणाला गती दिली जात असून जिल्ह्यातही लसीकरणाची मोहीम आत एक चळवळ सारखीच राबविली जात आहे. यातूनच आतापर्यंत जिल्ह्यातील ५६३३८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ४४९५०३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ११३८८३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

ठळक मुद्दे३ जुलै रोजी बनला रेकॉर्ड : ठरला आतापर्यंतचा हायेस्ट व्हॅक्सीनेशन डे’

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना लसीकरण जोमात सुरू असतानाच आतापर्यंत ५६३३८६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. शिवाय दिवसेंदिवस लसीकरणाची ही आकडेवारी झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र विशेष म्हणजे, ३ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वाधिक २१४०८ नागरिकांच्या लसीकरणाची नोंद घेण्यात आली आहे. यामुळे ३ जुलै रोजी लसीकरणाचा जिल्ह्यातील रेकॉर्ड बनला असून हा दिवस ‘हायेस्ट व्हॅक्सीनेशन डे’ ठरला आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय हाती आहे. अशात शासनाकडून लसीकरणाला गती दिली जात असून जिल्ह्यातही लसीकरणाची मोहीम आत एक चळवळ सारखीच राबविली जात आहे. यातूनच आतापर्यंत जिल्ह्यातील ५६३३८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ४४९५०३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ११३८८३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. विशेष म्हणजे, लसीकरणात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. तर लसीकरणाशिवाय आता उपाय नसल्याचे जाणून घेत नागरिक स्वत:च लसीकरणासाठी पुढे येऊन लागले असून यामुळे आकडेवारी झपाट्याने वाढत चालली आहे. असे असतानाच मात्र ३ जुलै हा दिवस जिल्ह्यासाठी खास ठरला असून या दिवशी जिल्ह्यात तब्बल २१४०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येत लसीकरणाची नोंद झाली नसून यामुळेच ३ जुलै ने लसीकरणाचा नवा रेकॉर्ड बनवला आहे. शिवाय हा दिवस जिल्ह्यात ‘हायेस्ट व्हॅक्सीनेशन डे’ म्हणून नोंद करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात ४३.३५ टक्के लसीकरण - शनिवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यात ५६३३८६ नागरिकांची लसीकरण झाले असून त्याची ४३.३५ एवढी टक्केवारी होत आहे. यामध्ये ४४९५०३ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून त्याची टक्केवारी ३४.५९ तर ११३८८३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची टक्केवारी ८.७६ एवढी आहे. विशेष म्हणजे, लसीकरणात जिल्हा आघाडीवर असतानाच फक्त ८.७६ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेणे हे मात्र अपेक्षित नाही. तरुणांची आगेकूच सुरूच - जिल्ह्यात २२ जूनपासून १८-४४ गटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून या गटातील तरुण व युवांनी लसीकरणासाठी धाव घेतली आहे. परिणामी जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढली आहे. जिल्ह्यात या गटातील १६४९१८ तरुणांनी लस घेतली असून यात १५२१४१ तरुणांनी पहिला तर १२७७७ तरुणांनी दुसरा डोस घेतला आहे. यानंतर आता हा गट आकडेेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.  

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या