शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पदे रिक्त, तरीही देणार उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा

By admin | Updated: September 28, 2015 02:02 IST

तालुक्यात सडक अर्जुनी व सौंदड या दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालय देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.

अनेक समस्या कायम : एक्स-रे मशीन धूळ खात, सोनोग्राफी, शवविच्छेदनाची सोय नाहीराजेश मुनिश्वर  सडक अर्जुनीतालुक्यात सडक अर्जुनी व सौंदड या दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालय देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. येणाऱ्या काही महिन्यात सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण रुग्णालय ग्रामीण असो किंवा उपजिल्हा, प्रत्यक्षात नागरिकांना हव्या त्या सुविधाच मिळत नसल्याने हे रुग्णालय कुचकामी ठरत आहे.सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात तीन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यात दोन तज्ज्ञ महिला डॉक्टर व एक पुरुष डॉक्टर रुग्णालयाला मिळाले आहेत. यात दोन स्त्री रोगतज्ज्ञ व बधीरीकरण तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी असूनसुद्धा महिलांच्या शस्त्रक्रिया होत नाही. या शस्त्रक्रिया करण्यासाठी गोंदिया, भंडारा, साकोली या ठिकाणी जावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्ह्याच्या आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.शवविच्छेदनगृह असून नसल्यासारखे आहे. या ठिकाणी शवविच्छेदनास मदत करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पद भरलेले नाही. त्यामुळे शवविच्छेदन होतच नाही. कळस म्हणजे या रुग्णालयात जनरेटरची किंवा इन्व्हर्टरचीही सोय नाही. त्यामुळे रात्री वीजपुरवठा खंडित झाला तर चक्क मेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार केले जातात.येथे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. दररोज शंभरावर रुग्णांची तपासणी केली जाते. तालुक्यात कुठेही रोगाची साथ नसल्याचे दिसून येत आहे. पण हे रुग्णालय राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या ३ किलोमीटरवर आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना त्वरित उपचारासाठी येथे सर्व सोयी असणे गरजेचे आहे. या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा नाही दिला तरी चालेल, पण सध्या मंजूर असलेल्या सोयी आणि मनुष्यबळ द्यावे, एवढीच रास्त अपेक्षा नागरिकांची आहे. अन्यथा ‘नाव सोनाबाई आणि हाती कथलाचा वाडा’ अशी अवस्था या रुग्णालयाची झाल्याशिवाय राहणार नाही, हे विशेष.