शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

करियर घडविण्यासाठी लोकराज्य उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:19 IST

शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात शासकीय ध्येय-धोरणांची माहिती असते. लोकराज्य हे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी व करियर घडविण्यासाठी सुद्धा उपयुक्त असल्याचे प्रतिपादन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी चतुर्वेदी यांनी केले.

ठळक मुद्देरजनी चतुर्वेदी : लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात शासकीय ध्येय-धोरणांची माहिती असते. लोकराज्य हे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी व करियर घडविण्यासाठी सुद्धा उपयुक्त असल्याचे प्रतिपादन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी चतुर्वेदी यांनी केले. येथील नमाद महाविद्यालयात मंगळवारी (दि.११) आयोजित लोकराज्य वाचक अभियान कार्यक्र मात त्या अध्यक्षस्थानावरु न बोलत होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, प्रा.बबन मेश्राम, डॉ.किशोर वासनिक, प्रा.शशिकांत चवरे, डॉ.अर्चना जैन, प्रा.उमेश उदापुरे, प्रा.आशा बघेले, प्रा.पटले व प्रा.भुरे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.चतुर्वेदी यांनी, लोकराज्य मासिकात शासनाच्या योजनांची व उपक्र मांची विस्तृत माहिती दिलेली असते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचन करताना लोकराज्य मासिकाला प्राधान्य दयावे असे सांगितले. प्रा.मेश्राम यांनी, शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्यने विविध विषयांवर विशेषांक काढले असून हे विशेषांक लोकिप्रय ठरले आहेत. लोकराज्य वाचक अभियानात लोकराज्य घरोघरी पोहोचिवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाची मोहीम आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी असे ही ते म्हणाले.प्रास्ताविकातून गिते यांनी, लोकराज्य मासिक हे महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे तर देशात दुसºया क्र मांकाचे मासिक असून शासनाच्या विविध योजनांची अधिकृत माहिती देणारे मासिक आहे. लोकराज्य वाचक अभियानाच्या माध्यमातून लोकराज्यचे नियमीत वाचन करावे व शासनाच्या योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी असे त्यांनी सांगितले. संचालन धम्मदिप मडामे यांनी केले. आभार प्रा.आशा बघेले यांनी मानले. कार्यक्र माला नमाद महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.‘लोकराज्य वारी’ विशेषांकाचे प्रकाशनस्वामी विवेकानंद यांनी शिकागो परिषदेत दिलेल्या भाषणास आज १२५ वर्ष पूर्ण झाले त्यानिमीत्त त्यांच्या ऐतिहासिक भाषणाचे वाचन या निमित्ताने महाविद्यालयात करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांचे शिकागो परिषदेतील भाषण आजही प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले. बंधू आणि भगिनींनो असे संबोधन विवेकानंदांनी याच भाषणात केल्याचे त्यांनी सांगितले. स्वामी यांचे हे भाषण ऐतिहासिक असून या भाषणाचे पठण प्रत्येकाने करावे असे त्या म्हणाल्या. दरम्यान ‘लोकराज्य वारी’ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.