शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ आरोग्यासाठी शौचालयाचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 01:54 IST

शरीर हीच मानव जातीची मोठी संपत्ती आहे. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी समाजातील प्रत्येकानेच नित्यनेमाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा.

उषा मेंढे : स्वच्छ भारत मिशन आढावा सभेत मार्गदर्शन इसापूर : शरीर हीच मानव जातीची मोठी संपत्ती आहे. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी समाजातील प्रत्येकानेच नित्यनेमाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा. त्यामुळे समाजात आरोग्यावर होणारा खर्च कमी होऊन आपली आर्थिक बचत होईल व पर्यायाने आपला विकास होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. त्या अर्जुनी मोरगाव पंचायत समितीत आयोजित स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आढावा सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना असून शौचालय बांधकामासाठी शासनाकडून बारा हजार रुपये अनुदान मिळत असून अनेक लोक शौचालय बांधतात, पण वापर करीत नाही. कुटुंबातील सर्व लोक उघड्यावर शौचास जातात. आपली आई-बहीण आदी महिला वर्गसुद्धा उघड्यावर शौचास जातात. कधी कधी तर साप, विंचवामुळे दुर्घटना घडतात. हे सर्व टाळण्यासाठी १८ व १९ जुलैला दिल्ली येथील कार्यशाळेत मी स्वत: जि.प. अध्यक्ष म्हणून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे वचन दिले आहे. हे वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता विभाग) राजेश देशमुख, लेखा विभागाचे सहायक लेखा विभाग अधिकारी जंवजाळ, अर्जुनी-मोरगाव पं.स. सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, खंड विकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, पं.स. सदस्य रामलाल मुंगगकर उपस्थित होते. प्रास्ताविकात खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती शासनाच्या विविध योजना राबवून ग्रामविकास करण्यासाठी सदैव तत्पर राहते. आतापर्यंत तालुक्यातील १३ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या असून या आर्थिक वर्षात ७० पैकी १२ ग्रामपंचायतींनी ४० लाख रुपयांच्या वर मग्रारोहयोचे कामे करुन १ एप्रिल ते १५ जुलै २०१६ पर्यंत साडेतीन महिन्यांच्या काळात १६ कोटी रुपयांचे काम करुन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन दिले. या वेळी हागणदारी मुक्त ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सरपंचाची असून तुम्ही तुमच्या गावचे मुख्यमंत्री आहात. योजना जनतेपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणारा सरपंच हा दूत आहे, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत फुलकुंडवार यांनी आपला जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करु. गावातील एकही व्यक्ती बाहेर शौचास जाणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेला सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. संचालन कृषी विकास अधिकारी डी.बी. उईके व गटसमन्वयक एच.आर. अंबुले यांनी केले. आभार सहायक खंड विकास अधिकारी राजेश वलथरे यांनी मानले. (वार्ताहर)