शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आहारात सेंद्रिय अन्नधान्याचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतातील पिकांवर रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. एकेकाळी शेतात कोणतेही रासायनिक खत व किटकनाशके मारण्यात येत नव्हती. त्यामुळे माणसे निरोगी होती. आज आपणाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आहारात बदल करुन ...

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी चाखली सेंद्रिय भाताची चव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतातील पिकांवर रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. एकेकाळी शेतात कोणतेही रासायनिक खत व किटकनाशके मारण्यात येत नव्हती. त्यामुळे माणसे निरोगी होती. आज आपणाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आहारात बदल करुन सेंद्रीय अन्नधान्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.कारंजा येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि.१०) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने (आत्मा)े पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी घेण्यात आलेल्या सेंद्रिय तांदळापासून शिजवलेला भात खावू घालण्याच्या कार्यक्र मात ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना काळे यांनी, आज आपण डॉक्टरकडे गेलो तर तपासणीसाठी १०० ते २०० रूपये फी लागते. दुर्दैवाने कोणी आजारी पडले तर २ ते ४ हजार रूपये कमीतकमी खर्च येतो. स्वस्तातील अन्न खाल्ल्यामुळे दवाखान्यात जावे लागते. स्वत:च्या प्रकृतीकडे आपण खाण्याच्या सवयीमुळे दुर्लक्ष करतो. आज जगभर सेंद्रीय अन्नधान्याची मागणी वाढत आहे. महिलांनी सुध्दा कुटूंब प्रमुखाकडे सेंद्रीय शेतीतील उत्पादीत मालासाठी आग्रह धरावा असे सांगितले.डॉ.भूजबळ यांनी, सेंद्रिय तांदळाचा दैनंदिन आहारात वापर व्हावा यासाठी प्रचार-प्रसाराचा भाग म्हणून हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी आहारात विषमुक्त अन्न काळाची गरज आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचे दुष्परिणाम जाणवत आहे.त्यामुळे अशा कीटकनाशक व खतांवर बंदी आली पाहिजे. दररोज अन्नाच्या माध्यमातून विष खाण्यात येत आहे. पोलीस कुटूंबातील सर्वजण निरोगी राहण्यास सेंद्रीय शेतीतून उत्पादीत अन्न खाणेसुध्दा काळाची गरज झाली आहे, असे मत व्यक्त केले.संचालन आत्माचे सचिन कुंभार यांनी केले. आभार हिंदूराव चव्हाण यांनी मानले. कार्यक्र माला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस उपअधीक्षक(गृह) दिपाली खन्ना यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.