शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:43 IST

भारत हा कृषीप्रधान देश असून ६० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. विविध भागात विविध प्रकारचे पीक घेतले जातात. विविध पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पोशिंदा म्हटले जाते. त्याला सोबती म्हणून सतत बैलजोडी असायची.

ठळक मुद्देमजुरांची कमतरता : बैलजोड्यांची संख्या घटली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारत हा कृषीप्रधान देश असून ६० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. विविध भागात विविध प्रकारचे पीक घेतले जातात. विविध पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पोशिंदा म्हटले जाते. त्याला सोबती म्हणून सतत बैलजोडी असायची. परंतु आधुनिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या आता कमी होऊन धानाच्या कापणी व मळणीकरिता यंत्रांच्या मागणीत आता वाढ झाली आहे.पूर्वी शेतकऱ्यांना पेरणीपासून मळणीपर्यंत बैलजोडीची गरज मोठ्या प्रमाणात भासत होती. प्रत्येक शेतकºयाकडे गोधन मोठ्या प्रमाणात असायचे. घरोघरी दूध, दही व तूप भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असे. कुटुंबात शेतीसाठी बैल असायचे. पण आता सर्वत्र देशी गायी पाळण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.गावरान गाईच्या तुलनेत अधिक दूध देणाऱ्या जर्सी होलस्टीन क्राईनखिस मुर्रा म्हैस अधिक नफा मिळविण्याच्या हेतूने शेतकरीबांधव पाळत आहेत. धान पिकांची कापणी मळणी झाल्यानंतर शेतात गुरेढोरे चारण्याकरिता भरपूर मोकळी जागा असायची. परंतु आता सर्वत्र मोकळ्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. मोकळ्या जागा लोकांनी गिळंकृत केली आहे.अनेक ठिकाणी सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने वर्षातून दोन-तीनदा पीक घेतले जातात. त्यामुळे गुरांना चारण्याचा प्रश्न निर्माण झाला. खेड्यातील गोधन झपाट्याने कमी झाले व म्हशींची संख्या रोडावली. त्यामुळे शेतीसाठी उपयोगी बैलांची संख्या कमी झाली व यंत्रांची मागणी वाढली आहे.ट्रॅक्टरने नांगरणी आणि वखरणी करून शेतात पेरणी केली जाते. सध्या शेतकरी मळणीसाठी बैलबंडी सोडून थ्रेसर ट्रॅक्टर मशिनचा उपयोग करीत आहेत.बैलांद्वारे धानाची मळणी केल्यास अधिक वेळ खर्च होतो. त्यातच मजुरांचा खर्चही अधिक. त्यामुळे आज शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळले आहेत. गोंदिया जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. धानाच्या मळणीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागते.त्यामुळे बरेच शेतकरी मळणी यंत्राने धान, गहू, हरभरा व इतर पीक शेतातून काढत आहेत. कमी वेळात लवकर धान्य तयार होत असल्याने डिझेल किंवा विजेवर चालणाºया मळणी यंत्रांकडे शेतकºयांचा अधिक कल दिसून येत आहे. धान्य शेतकरी आता थेट बाजारात विकत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीtechnologyतंत्रज्ञान