शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता पलटविण्यासाठी अल्पवयीन मजुरांचा वापर

By admin | Updated: May 8, 2016 01:38 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी परिसरातील डुंडा, गोंगले, खाडीपार, मुरपार राम, घटेगाव, सितेपार, धानोरी, मुरपार, लेडेझरी इत्यादी ठिकाणी तेंदूपत्ता संकलन झाले आहे.

उष्माघाताची शक्यता : संकलन करणाऱ्यांचेही आर्थिक शोषणपांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी परिसरातील डुंडा, गोंगले, खाडीपार, मुरपार राम, घटेगाव, सितेपार, धानोरी, मुरपार, लेडेझरी इत्यादी ठिकाणी तेंदूपत्ता संकलन झाले आहे. काही ठिकाणी मुन्शी वर्गाकडून फळीवर पाने पलटविण्याकरीता १० ते १४ वर्षाच्या मुलाचा सर्रास वापर केला जात आहे. शासनाने बालकांच्या हक्कासाठी बालगुन्हेगारी कायदा अंमलात आणला. त्या कायद्याची अवहेलना होताना दिसत आहे. सध्या मजूर वर्गाला १५० ते २०० रुपये प्रमाणे रोजी देण्यात येत आहे. परंतु बालकांना कामावर लावून कमी पैशामध्ये काम करून मोठ्या प्रमाणात नफा कमविताना मुन्शी वर्ग दिसत आहे. त्याचप्रमाणे मजूर वर्गाकडून फळीवर पुडे घेताना पाच पुडे अधिक घेत असतात व ते पुडे संबंधीत व्यक्तीच्या नावे चढवून नफा कमविताना दिसत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. यंदा प्रति शेकडा १८० रुपये देत मजूरी देण्यात येत आहे. मजूर वर्गाला बोनस मिळत असतो. मजूरवर्ग सकाळी जिवाची पर्वा न करता जंगलात एक-एक पान गोळा करीत असतात. त्यांना वन्यप्राण्यांपासून स्वत:चे सरंक्षण करावे लागते. अशा परिस्थितीमध्ये मुन्शी वर्ग फळीवर लूट करीत असतो. आपला फायदा घेत असतो. त्यावर आळा घालण्यात यावा व बालमजुरावरील शोषण थांबविण्यात यावे, अशी मागणी जनतेने केली आहे. (वार्ताहर)