शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात अवैध मुरूमाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:19 IST

आमगाव ते देवरी दरम्यान तयार होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अवैध मुरूमाचा वापर केला जात आहे. या अवैध गौण खनिजामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. या प्रकरणाची तक्रार कारूटोला ग्रामपंचायतने सालेकसा येथील तहसीलदारांकडे केली आहे.

ठळक मुद्देकारूटोला ग्रामपंचायतची तक्रार : बुडत आहे लाखोंचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव ते देवरी दरम्यान तयार होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अवैध मुरूमाचा वापर केला जात आहे. या अवैध गौण खनिजामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. या प्रकरणाची तक्रार कारूटोला ग्रामपंचायतने सालेकसा येथील तहसीलदारांकडे केली आहे.आमगाव-देवरी मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. मागील दिड वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे बांधकाम एम.बी. कंस्ट्रक्शन कंपनी (पुणे) यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र कंस्ट्रक्शन कंपनी आपल्या मनमर्जीने वाटेल त्या ठिकाणचे खोदकाम करून मुरूम रस्त्याच्या ठिकाणी टाकत आहे. सालेकसा तालुक्यातील कारूटोला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट क्र. ४०३ मधूनही अवैधरित्या गौण खनिजाचे खनन करण्यात आले आहे.कुठल्याही ग्रामपंचायतच्या हद्दीतील खनन करण्यापूर्वी ग्रामपंचायतची परवानगी व महसूल विभागाकडूनही परवानगी घ्यावी लागते. परंतु या ठिकाणचे खनन करताना कुणाचीही परवानगी घेण्यात आलेली नाही.जेसीबीच्या सहायाने मुरूमाचे खनन करून शासनाला लाखो रूपयांचा चुना लावला जात आहे. या संदर्भात तहसीलदारांकडे कारूटोलाच्या सरपंच राया फुन्ने, उपसरपंच नंदू चुटे, सदस्य संतोष बोहरे, संजू बागडे व इतर सदस्यांनी तक्रार केली आहे.हजारो ब्रास मुरूम चोरीराष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी कारूटोला ग्रामपंचायतच्या हद्दीतील हजारो ब्रास मुरूम परवानगी न घेताच काढण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायतकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात २९ मार्च रोजी सालेकसाच्या तहसीलदारांना सरपंचाच्या स्वाक्षरीने लेखी तक्रार करण्यात आली. परंतु तहसीलदारांनी २५ दिवस लोटूनही कारवाई केली नाही. त्यामुळे बांधकाम करणाऱ्या कंपनी सोबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे तर नाही ना अशी शंका नागरिकांना येत आहे.‘मौत का कुआॅ’कारूटोला येथील मुरूमाचे खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात खोल खड्डा करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या खड्यात मोठ्या प्रमाणात गोळा होईल. अशात पावसाळ्याच्या दिवसांत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैधरीत्या मुरूमाचे खनन केले जात असल्याने या ठिकाणी ‘मौत का कुआॅ’ तयार झाला आहे.रॉयल्टीची रक्कम ग्रामपंचायतला दिलीच नाहीज्या ग्रामपंचायतच्या हद्दीतून मुरूमाचे खोदकाम केले जाते त्याची रॉयल्टी महसूल विभागाकडून घेतली जाते. त्या रॉयल्टीची १० टक्के रक्कम संबंधीत ग्रामपंचायतला विकासासाठी दिली जाते. परंतु कारूटोला ग्रामपंचायत अंतर्गत हजारो ब्रास मुरूम काढण्यात आले. त्याची रॉयल्टी नसल्यामुळे ग्रामपंचायतला कवडीही मिळाली नसून यामुळे गावकºयांमध्ये आक्रोश आहे.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग