शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कुलरचा वापर करताना घ्या खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:28 IST

गोंदिया: उन्हाचा कडाका वाढल्याने स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात आले आहे. उकाड्यामुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला आहे. कुलर काळजीपूर्वक ...

गोंदिया: उन्हाचा कडाका वाढल्याने स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात आले आहे. उकाड्यामुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला आहे. कुलर काळजीपूर्वक वापरून विजेचे अपघात टाळणे गरजेचे आहे. प्राधान्याने मुलांना कुलरपासून दूर ठेऊन सकर्तता बाळगणे हितावह ठरणारे आहे.

उन्हाळ्यात शॉक लागून जीवितहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी होते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थिंग लिकेज सर्किट बेस बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध आहेत. विजेचा धोका संपताच विजेचा पुरवठा बंद होतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कुलरच्या लोखंडी बाह्य भागात वीजपुरवठा येऊ नये, यासाठी कुलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी. पाणी भरताना कुलरचा वीजपुरवठा बंद ठेवावा, कुलरमधील पाणी जमिनीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर टिल्लू पंप सुरू करू नये, पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करावा. त्यानंतर प्लग काढल्यानंतर व पंपाला हात लावावा. पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी. बरेचदा पाण्याची पातळीही खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही. तो पंप एअर लाॅक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. बरेचदा अज्ञानामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केले जाते. अशावेळी विजेचा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे, अशा प्रकारे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे महावितरण गोंदिया परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी अविनाश साखरे यांनी कळविले आहे.