शुक्रवारी रात्रीही बरसला : शनिवारीही ढगाळ वातावरण गोंदिया : शुक्रवारी (दि.२९) रात्रीही अवकाळी पाऊस व विजेचा थयथयाट झाला. पहाटे पर्यंत हा प्रकार सुरू होता. विशेष म्हणजे जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी व आमगाव येथे पावसाच्या शिंतोड्यासह चांगलाच वादळ वारा होता. तर अन्य भागात मात्र या अवकाळी पाऊस वादळवाऱ्याने हजेरी लावली नसल्याची माहिती आहे. आता काहीच दिवसांपूर्वी बरसल्यानंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने गोंदियात रात्री १० वाजतादरम्यान हजेरी लावली. शहरात पहाटे पर्यंत हा प्रकार सुरू होता. तर गोरेगाव, तिरोडा, आमगाव व सडक अर्जुनी परिसरात पाण्याचे शिंतोडे व वादळी वारा होता. तर उर्वरीत भागात मात्र पाऊस नव्हता. शुक्रवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते व त्यात रात्री १० वाजता अचानकच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे बरसलेल्या पावसाची पुर नियंत्रण कक्षात आकडेवारी उपलब्ध नव्हती. त्यामुळे नेमका किती पाऊस कोणत्या भागात बरसला हे समजले नाही. मात्र या अवकाळी पावसानंतर शहरात शनिवारीही (दि.३०) ढगाळ वातावरण होते व वातावरणात गारवा निर्माण झाला होता. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात अवकाळी अन विजेचा थयथयाट
By admin | Updated: May 1, 2016 01:37 IST