शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

ग्रामरोजगार सेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन

By admin | Updated: March 10, 2017 00:42 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्राम रोजगार सेवक शनिवार, ४ मार्च २०१७ पासून आपल्या प्रलंबित मागण्यांना

बीडीओंना निवेदन : मग्रारोहयोच्या कामावर विपरित परिणामदेवरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्राम रोजगार सेवक शनिवार, ४ मार्च २०१७ पासून आपल्या प्रलंबित मागण्यांना घेवून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेले व सुरू होणाऱ्या कामावर विपरित परिणाम होत आहे. या आंदोलनासंदर्भात ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी एस.एम. पांडे यांना निवेदन दिले. निवेदनानुसार, २ फेब्रुवारी २००६ रोजी देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंमलात आणला आहे. यात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली असून याद्वारे ही योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेतून एका ग्राम रोजगाार सेवकाची निवड करण्यात येते. अशा ग्रामरोजगार सेवकांच्या समस्येबाबद आपली मागणी शासनापुढे वारंवार ठेवूनही शासन यांच्या मागण्यांकडे मुद्दाम कानाडोळा करीत आहे. मागण्यांमध्ये रोजगार सेवकांना मासिक वेतन १२ हजार रुपये देण्यात यावे, त्यांना त्यांच्या गावापासून ५ किमीच्या आत स्थानांतरण करण्यात यावे आणि त्यांचे वेतन ग्रामपंचायतला जमा न करता ग्रामरोजगार सेवकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, अशा विविध मागण्यांना धरुन ग्राम रोजगार सेवक ४ मार्चपासून पूर्ण राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील सुरू असलेले व सुरू होणाऱ्या कामावर विपरित परिणाम होत आहे.निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष सहदेव गावळकर, उपाध्यक्ष मेघनाथ बहेकार, सचिव धनराज बहेकार, सहसचिव कमल सोनवाने, कोषाध्यक्ष जगदीश राऊत, सहकोषाध्यक्ष राजेंद्रसिंह पवार, सल्लागार व सदस्य भिमराज बोरकर, नरेश गुरनुले, सुभाष सोनवाने, राधेलाल शहारे, चिमनबापू वारई, अशोक कोचे, निर्मला कोसरे व संतोष करमकार यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)