शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

युनिट कमी मात्र बिल अधिक

By admin | Updated: May 28, 2017 00:14 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नेहमी भोंगळ कारभारामुळे चर्चेत असतो. विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका

ग्राहक झाले त्रस्त : विद्युत विभागाचा भोंगळ कारभार लोकमत न्यूज नेटवर्क साखरीटोला : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नेहमी भोंगळ कारभारामुळे चर्चेत असतो. विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका येथील ग्राहकांना बसतो. नेहमीच येथील ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. युनिट कमी मात्र बील रक्कम अधिक असल्याची ओरड ग्राहकांकडून होत आहे. सालेकसा तालुक्याच्या मक्काटोला येथील धनलाल गोमा भांडारकर यांना युनिटच्या मानाने देय रक्कम अधिक पाठविण्यात आली. देयक २० मे २०१७ नुसार मागील रिडींग १८२० व चालू रिडींग १८२० असून सुध्दा वीजेचा वापर (युनिट) शंभर दाखवून देयक रक्कम ४५० रुपये पाठविण्यात आली आहे. जेव्हा रिडींग सारखीच आहे तर मग विद्युत विभागाने शंभर युनिट काढून दाखविले असा प्रश्न सदर ग्राहकाला पडला आहे. मागील देयक दिनांक १३ एप्रिल २०१७ नुसार चालू रिडींग १८२० व मागील रिडींग १८१२ होती यात केवळ ८ युनिटचा फरक होता मात्र बील ११० रु. पाठविण्यात आला. या प्रकारामुळे ग्राहकांना विनाकारण अधिकचे पैसे मोजावे लागतात. ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याचा माणस विद्युत वितरण कंपनीचा दिसून येते. हा प्रकार मागील अनेक दिवसापासून होत आहे. अनेक ग्राहकांकडून अश्या तक्रारी येत आहेत. जे ग्राहक आलेल्या बिलाकडे लक्ष न देता सरसकट पैसे भरतात त्यांची चांगलीच लुबाडणूक होत आहे. विद्युत विभागाचा कारभार कधी सुधारणार असा प्रश्न होत आहे. विजेचा लपंडाव सालेकसा तालुक्यात विजेचा मोठा लपंडाव सुरू आहे. तालुका नक्षलग्रस्त असतांनाही केव्हाही विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. सद्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असतानाही विद्युत पूरवठा खंडीत केला जातो. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. विद्युत विभागाला काहीही देखे घेणे नाही.