सोनाली देशपांडे : नोकरी मेळाव्याचे यशस्वी आयोजन लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शहरात तसेच ग्रामीण भागात सुशिक्षीत युवक-युवती मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या हाताला कामे नाहीत. त्यांना संधी मिळाल्यास बेरोजगारी कमी होईल, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल व ते स्वत:च्या पायावर उभे राहतील असे प्रतिपादन नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी केले. आमदार विजय रहांगडाले व नगराध्यक्ष देशपांडे यांच्या पुढाकाराने आयोजीत आयोजित नोकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार भजनदास वैद्य होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील यशस्वी गु्रपचे संचालक आशिष अतकरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, सदस्य पिंटू रहांगडाले, चर्तूभूज बिसेन, विजय ग्यानचंदानी, न.प.सभापती अशोक असाटी, श्वेता मानकर, सदस्या अनिता अरोरा, राखी गुणेरिया उपस्थित होते. याप्रसंगी युवक-युवतींची लेखी परीक्षा घेण्यात आली व त्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक-युवती सहभागी झाले. संचालन माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले. आभार राजेश मलघाटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्वानंद पारधी, विवेक ढोरे तसेच कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
संधी मिळाल्यास बेरोजगारी दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:48 IST