शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

कौशल्य विकास व रोजगार मेळाव्यात बेरोजगारांची झुंबड

By admin | Updated: April 12, 2017 01:14 IST

सडक अर्जुनी येथील पंचायत समितीसमोरील पटांगणावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने ...

युवक-युवतींची नोंदणी : विदर्भातील आणि बाहेरील अनेक कंपन्यांचे स्टॉलगोंदिया : सडक अर्जुनी येथील पंचायत समितीसमोरील पटांगणावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने आयोजित कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यात सोमवारी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक-युवतींनी हजेरी लावली. यावेळी लावण्यात आलेल्या विविध स्टॉलच्या माध्यमातून आवश्यक त्या प्रशिक्षणाचे अर्ज विद्यार्थ्यांनी भरु न दिले व विविध प्रशिक्षणाविषयी माहिती जाणून घेतली. त्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अर्थशास्त्र विषयावर प्रफुल्ल पवार, चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राठोड व करिअर प्लॅनिंगबाबत शैली गंभीर, उद्योजकता या विषयावर आनंद खडतकर यांनी मार्गदर्शन केले.या मेळाव्यात बार्टी, टॉप्स ग्रुप्स, थिंक स्कील, इंफोनेट, जावेद हबीब, बँक आॅफ इंडिया, रु स्तमजी ग्लोबल एजंसी, आय.बी.पी.एस.वर्धा, भंडारा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा यांच्यासह फ्युचर शार्प स्किल्स, सुखकर्ता इंजिनियरींग क्लस्टर पुणे, महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी, बी-एबल, क्विज कॉर्पोरेशन, हिंदूस्थान लॅटेक्स फॅमिली प्लॅनिंग प्रमोशन ट्रस्ट, ज्ञानदा इन्स्टीट्यूट आॅफ प्लो पायपिंग टेक्नॉलॉजी, युवा परिवर्तन गोंदिया, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरपीनरशिप डेव्हलपमेंट, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा माहिती कार्यालय, खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेले महामंडळे, आरव्हीएस एज्युकेशन ट्रस्ट, माविमचे आधार लोकसंचालीत साधन केंद्र, रमाबाई व लक्ष्मी महिला बचतगट डोंगरगाव, ओरियन एज्युटेक, बार्टी आयबीपीएस, आरोग्य विभाग, कविरा सोल्युशन, सामाजिक न्याय विभाग, जागृती महिला बचतगट, नागझिरा स्वयंसहायता बचतगट, शेतकर्णी, जागृती, महासरस्वती महिला बचतगट आदींचे स्टॉल तथा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा चित्ररथ यामध्ये लावण्यात आला होता.कार्यक्रमाला गोंदियाचे एसडिओ अनंत वालस्कर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक खडसे, सडक अर्जुनीचे तहसीलदार विठ्ठल परळीकर, गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट, प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी बार्टीचे अधिकारी व कर्मचारी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच समतादूत यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक बार्टीच्या निबंधक रुपाली आवळे यांनी तर संचालन रवि वरके आणि रजनी गायधने यांनी संयुक्तपणे केले. (जिल्हा प्रतिनिधी)