शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सुतार व्यवसायावर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: May 27, 2017 00:52 IST

पूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यांसाठी शेतकरी सुतारांकडे धाव घेत होते. मात्र, आता लाकडी अवजारा ऐवजी रेडीमेड मिळणारी लोखंडी अवजारे

बलुतेदारी पद्धत कालबाह्य : शेतकऱ्यांची "रेडिमेड" साहित्यांकडे धाव लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यांसाठी शेतकरी सुतारांकडे धाव घेत होते. मात्र, आता लाकडी अवजारा ऐवजी रेडीमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध झाल्याने सुतारांच्या व्यवसायावर बेरोजगारीची कुऱ्हाड चालली आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळात ग्रामीण भागातील बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. ही पद्धती काळाच्या ओघात लुप्त पावत चालली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेडेगावात बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार होते. बलुतेदार व अलुतेदार गावातील शेतकऱ्यांना वर्षभर सेवा पुरवत असून त्या मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून मोबदला म्हणून धान्य मिळे. परंतु, यांत्रिक युगाचा प्रारंभ झाल्यापासून शेतीमध्ये लागणाऱ्या लाकडी अवजाराऐवजी कारखान्यातूनच रेडिमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध होत असल्याने बारा बलुतेदारांमध्ये समाविष्ट असलेल्या सुतारांच्या व्यवसायावर पाणी फेरले आहे. सुतार कुटुंबीयांचे संपूर्ण जीवन हे त्यांच्या कलाकौशल्यातून घडविलेल्या विविध लाकडी वस्तूंच्या मिळकतीतून घडविले जात असे. शेतीसाठी लागणारे, नांगर, वखर, फन, डवरा, ज्यू, भोवऱ्या खाचरा बंडी, तिफन, खातवा, रुमण्या आदी इत्यादी अवजारे तर घरगुती साहित्यात पलंग, टेबल, खूर्ची, पाट, घराचे छप्पर ठोकणे, दरवाजे, खिडक्या, कोरपाट-बेलना आदी वस्तू तयार करीत असे. घरगुती साहित्य असो की, शेतीची अवजारे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन साहित्य बनविण्यासाठी किंवा त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकरीवर्ग सुताराकडे येरझारा मारत असत. सुतारही त्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पाहिजे त्या आकारात शेतीची अवजारे बनवून देत असत. सुतार बनवलेल्या अवजारांपासून मिळालेल्या मिळकतीतून आपल्या कुटुंबीयांची गरज भागवीत असे. परंतु आता लोखंड व प्लास्टिकपासून बनविलेली शेतीची अवजारे बाजारात उपलब्ध झाली आहेत. किंमतीच्या बाबतीत ही अवजारे थोडी महाग असली तरी टिकावू होत असल्याने रेडिमेड अवजारांकडे आकर्षित होत आहे. यामध्ये बैलगाडी, भोवरी, वखर, डवरा शहरात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एकेकाळी १२ बलुतेदारांत महत्वाचा मानला गेलेला सुतार व्यवसाय करणाऱ्या सुतारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.