शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रांच्या आगमनाने मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: May 7, 2017 00:23 IST

सध्याच्या संगणकीय युगात अत्याधुनिक यंत्र उपलब्ध होऊ लागले आहेत. शेतकाम, खोदकाम व शासकीय कामे आता यंत्रामार्फत केली जातात.

युग संगणकाचे : सर्वच कामात मशीनचा वापर लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सध्याच्या संगणकीय युगात अत्याधुनिक यंत्र उपलब्ध होऊ लागले आहेत. शेतकाम, खोदकाम व शासकीय कामे आता यंत्रामार्फत केली जातात. त्यामुळे मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. संगणकाने देशात प्रवेश केला आणि त्या पाठोपाठ विविध यंत्रणा कामाला लागल्या. शासकीय कामातही मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर होवू लागला. रोजगार हमी योजना यासारख्या कामातही शासन यंत्रांचा वापर करीत आहे. कुठल्याही शहरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम असो किंवा शासन स्तरावरील खोदकाम असो, यंत्रांद्वारे अगदी अल्प वेळात ते उरकवून घेतले जाते. पूर्वी ज्या ठिकाणी शेकडो मजूर कामाला जात होते, त्या ठिकाणी आता अत्यल्प मजुरांकडून कामे करवून घेण्याचा प्रकार सुरू आहे. ही सर्व कामे यंत्रांद्वारे केली जात आहेत. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि यंत्रांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शासकीय कंत्राटदार लाखो रूपये खर्च करून यंत्रांची खरेदी करीत आहेत. सिमेंट काँक्रीटचे काम करण्यासाठीसुद्धा आता यंत्र उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सिमेंट, रेती व गिट्टी यांना एकत्रित करून बांधकामही लवकरात लवकर केले जात आहे. शेती कामातही ट्रॅक्टर, हार्वेस्टर, थ्रेसर यासारख्या यंत्रांचा उपयोग केला जात आहे. शेतीची मशागत, नागरणी, वखरणी व मळणी यासारखी शेतीसाठी उपयोगी अवजारे आता नेस्तनाबूत झाल्याने अवजारे तयार करणाऱ्या सुतारांच्या व्यवसायांवर उतरती कळा लागली आहे.