शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन त्वरित पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

आमगाव : रस्त्याच्या बांंधकामामुळे तुटलेली बनगाव व इतर ४७ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन त्वरित पू‌र्ववत करावी, असे निर्देश आमदार ...

आमगाव : रस्त्याच्या बांंधकामामुळे तुटलेली बनगाव व इतर ४७ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन त्वरित पू‌र्ववत करावी, असे निर्देश आमदार सहषराम कोरोटे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी (दि.१९) घेतलेल्या विशेष बैठकीत दिले.

देवरी ते आमगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ व आमगाव रेल्वे स्थानक ते वाघ नदी (मध्य प्रदेश) सीमेपर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामामुळे बनगाव व इतर ४७ गावांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची मुख्य वितरक पाइपलाइन खोदकामामुळे मागील अनेक दिवसांपासून तुटून पडलेली आहे. नवीन रस्त्याच्या बांधकामामध्ये सदर पाइपलाइन बदलविणे व सुधारित करण्याचे अंदाजपत्रक समाविष्ट असल्याने ते काम संबंधित कंत्राटदार कंपनीला करणे हे बांधील असूनही संबंधित कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, त्याची दखल प्रशासकीय पातळीवर संबंधित कंत्राटदाराने घेतली नाही. यावर आमदार कोरोटे यांनी सोमवारी (दि.१९) या विषयाला घेऊन तहसील कार्यालयात विशेष बैठक घेतली.

बैठकीत आमदार कोरोटे यांनी, संबंधित यंत्रणेची झडती घेऊन लवकरात लवकर योजनेची पाइपलाइन पूर्ववत करण्याचे कडक निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग (देवरी) अधिकाऱ्यांना दिले. यावर उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ काम संबंधित कंत्राटदार कंपनीकडून करून घेण्याची हमी दिली. यामुळे आठवडाभरात तालुक्यातील मुख्य ठिकाणापासून तुटलेल्या पाइपलाइनचे काम पूर्ण होणार असून, नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. बैठकीला काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संजय बहेकार, तहसीलदार डी.एस. भोयर, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपविभागीय अभियंता कटरे, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, एम.बी.पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी व शिवालय कंपनीचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.