शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांना अघोषित भारनियमनाचा शॉक

By admin | Updated: August 13, 2015 02:15 IST

गोंदिया शहरासह ग्रामीण भागात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. परंतु महावितरणकडून कोणतेही भारनियमन सुरू नाही, असे सांगितले जात आहे.

दररोज वीज गायब : महावितरण म्हणते, भारनियमन नाही!गोंदिया : गोंदिया शहरासह ग्रामीण भागात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. परंतु महावितरणकडून कोणतेही भारनियमन सुरू नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे दररोज खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामागील नेमके कारण काय, असा प्रश्न सर्वसामान्य वीज ग्राहकांना पडला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात विजेची मागणी प्रचंड वाढलेली असतानाही दररोज वीज पुरवठा खंडित होत नव्हता. मात्र आता ब्रेक डाऊन, वाहिन्यांमधील बिघाड व ट्रान्सफार्मरमधील बिघाड असे एक ना अनेक कारण पुढे करून दररोज खंडित केल्या जात असलेल्या वीज पुरवठ्याने जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत.या खंडीत विद्युत पुरवठ्याला विद्युत वितरण कंपनी नियमित भारनियमन न समजता ‘इमरजन्सी लोडशेडिंग’ म्हणत आहे. पण दररोजच गोंदिया शरात व ग्रामीण भागात कोणते ना कोणते कारण दाखवून दररोज विद्युत पुरवठा खंडीत केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कृषी पंपांना मोठ्या प्रमाणात वीज लागत होती. कृषीपंपानाही १० ते ११ तास वीज पुरवठा केला जात होता. याशिवाय सर्वांच्या घरात कुलर, पंखे, एसीचा वापर होत असल्याने मोठ्या प्रमाणात विजेची मागणी होती. परंतु त्या दिवसातही नियमित भारनियमन होत नव्हते. कधी कधी एक किंवा दोन तासाकरिता विद्युत पुरवठा खंडीत होत होता. परंतु आता विजेची मागणी कमी असतानाही दररोज शहरातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. या नियमितपणे खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्याला भारनियमन असे विद्युत वितरण विभाग मानत नाही. त्यामुळे दररोज वीज पुरवठा खंडित करण्यामागे असे कोणते दुरूस्तीचे काम करावे लागत आहे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. पाऊस पडल्यामुळे आता वीजेची मागणीही जास्त नाही. तरीही महावितरणकडून ग्राहकांचा छळ सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)