शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीखाली व्यापारी गाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:21 IST

जिल्हा परिषदेतंर्गत तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून त्यांचे नियोजन नसल्याने या कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. याचाच परिचय बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील पाण्याच्या टाकीखाली व्यापारी गाळे ....

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा अजब कारभार : जागेचे नियोजन नसताना बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : जिल्हा परिषदेतंर्गत तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून त्यांचे नियोजन नसल्याने या कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. याचाच परिचय बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील पाण्याच्या टाकीखाली व्यापारी गाळे बांधकामाचे ले-आऊट टाकल्याने दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.नगर परिषद परिक्षेत्रात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव येथे रुग्णसेवा बंद करण्याचा घाट करुन येथील परिसरात जि.प.ने व्यापारी गाळे बांधकाम प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी मुलभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी जि.प. कडे निधी नाही. मात्र व्यापारी गाळे बांधण्यासाठी जि.प.कडे निधी असून रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी निधी नसल्याचे चित्र आहे. रुग्णालय परिसरात रुग्णांना सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज असताना जि.प.ने व्यापारी गाळे बांधकामाला प्राधान्य दिले आहे.या परिसरातील जागेचे नियोजन नसताना या ठिकाणी व्यापारी गाळे बांधकाम नियोजन प्रस्तावाला ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर रुग्णालय परिसरात मंजूर प्रस्तावाप्रमाणे व्यापारी गाळ्यांसाठी जागाच नाही.त्यामुळे सरळ पाणी पुरवठा योजनेच्या पाणी टाकीच्या खालीच व्यापारी गाळे बांधकामाचे ले-आऊट देण्यात आले आहे. त्यामुळे बांधकामाच्या आराखड्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील नियोजन शुन्यता या बांधकामातून पुढे आल्याने रुग्ण सेवेचा प्रश्न पुढे ठाकला आहे. पाणी पुरवठा पाण्याच्या टाकीखालीच व्यापारी गाळे बांधकामाला मंजुरी मिळालीच कशी हा प्रश्न अनुत्तरित आहे.तहसीलदार, प्रशासकांची बांधकामाला ताकीदआमगाव येथील पाणी टाकीलगत सुरू असलेल्या व्यापारी गाळ्यांच्या बांधकामामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पाणीटाकी परिसरात काटेरी कुंपण तयार करुन सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली. मात्र कुंपनाच्या परिसरातच ले-आऊट टाकण्यात आल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार तहसीलदार साहेबराव राठोड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बांधकाम विभागाला ताकीद दिल्याची माहिती आहे.