शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या उड्डाणपुलाखालील ५० कुटुंबे आली उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

शहरातील जुन्या उड्डाणपुलाच्या खाली भांडे, कपडे धुणे आणि साफसफाई करण्याचे काम करणाऱ्या मजुरांचे सुमारे ५० कुटुंबीय गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव करीत आहे; मात्र जुन्या पुलाला पाडण्याचे काम सुरू असल्याने त्यांची घरे हटविण्याची गरज आहे. अशात रविवारी (दि.५) त्यांच्या घरांवर बुलडोझर चालविण्यात आला. अचानकपणे कुटुंबांवर बेघर होऊन रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मुख्य मार्गावरील रेल्वे पुलाखाली जवळपास ५० कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून घरे बांधून राहत होती. जुन्या उड्डाणपुलाची मुदत संपल्याने ते पाडण्याचे काम आता सुरू असून यामुळे मात्र या पुलाखाली राहणाऱ्या ५० कुटुंबीयांच्या घरातील सामान पोलीस संरक्षणात बाहेर काढून त्यांचे घर बुलडोझरने पाडण्यात आले. त्यामुळे त्यांना आता आपल्या मुलाबाळासह उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. यादरम्यान जुन्या पुलाखाली तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आक्रमक झालेल्या बेघर कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात ठिय्या मांडण्याचा निर्धार केला आहे. शहरातील जुन्या उड्डाणपुलाच्या खाली भांडे, कपडे धुणे आणि साफसफाई करण्याचे काम करणाऱ्या मजुरांचे सुमारे ५० कुटुंबीय गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव करीत आहे; मात्र जुन्या पुलाला पाडण्याचे काम सुरू असल्याने त्यांची घरे हटविण्याची गरज आहे. अशात रविवारी (दि.५) त्यांच्या घरांवर बुलडोझर चालविण्यात आला. अचानकपणे कुटुंबांवर बेघर होऊन रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत या कुटुंबांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. आता आम्ही कुठे जाऊ अशी आर्त हाक लहान मुलांपासून वयस्क महिला करीत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा असूनसुद्धा आज या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. शासनाने त्यांना बेघर केले; मात्र आता या कुटुंबांना निवाऱ्याची सोय होणार की नाही, हे सर्व कुटुंब जाणार कुठे? हा प्रश्न आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण