शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकाम मंदावले

By admin | Updated: July 21, 2016 01:14 IST

अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) सुरु केले. यातून गावे पूर्णत: ...

आधी बांधकाम, नंतर पैसे : १० हजार उद्दिष्टांपैकी फक्त ७०० शौचालयांचे बांधकाम विलास बन्सोड उसर्रा अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) सुरु केले. यातून गावे पूर्णत: हागणदारीमुक्त व्हावे, यासाठी मोहाडी तालुक्यात दहा हजार शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी फक्त ७०० शौचालयांचे बांधकाम झाले आहे. परिणामी अभियानाची गती मंदावली आहे. सन २०१६-१७ वर्षात स्वच्छ भारत अभियानातून मोहाडी तालुक्याला १० हजार ६९४ शौचालय बांधकाम उद्दिष्ट्ये देण्यात आली. यात लाभार्थ्यांना अंदाजे १२ हजार रुपये पर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. यात बी.पी.एल.ची अट सुद्धा नाही. यासाठी पंचायत समिती मोहाडीच्या पाणी व स्वच्छता विभागाने हागनदारीमुक्त कृती आराखडा अंतर्गत प्रत्यक्ष गावातील नागरिकांना भेटून सदर योजनेचे उद्दिष्ट, महत्व व त्याचे फायदे याविषयी माहिती देतात. कोठे शौचालयाची आवश्यकता वाटल्यास व गरजू लाभार्थ्यांना शौचालय पाहिजे असल्यास तसा तो प्रस्तावित करतात. पंचायत समितीच्या माध्यमातून जनजागृती सुरु आहे. पण आतापर्यंत काही ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेऊन शौचालय बांधकाम प्रगतीपथावर आहे. पण काही ग्रामपंचायतीने अद्यापही शौचालय बांधकामासाठी पुढे आल्या नाही. काहींच्या मते ऐन पावसाळा सुरु असताना व शेतीची कामे सुरु असताना शौचालयासाठी पैसा आणणार कुठून? असा प्रश्न आहे. पंचायत समितीकडून आधी शौचालय बांधकाम करा व नंतर पैसे देऊ असे बोलले जाते. पण आता शेतीसाठी पैसा लागत असल्याने काहींनी फक्त शौचालयाचे खडड्ेच खोदून ठेवले आहे. आगाऊ रकमेची आवश्यकता सध्या शेतीचा हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांकडे पैसे नाही. यासाठी पंचायत समितीस्तरावर २५ टक्के रक्कम आगाऊ मिळाली पाहिजे, असे बहुतेक लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. शौचालय बांधकामासाठी विटा, रेती, सिमेंट, गिट्टी या कामासाठी जर पंचायत समितीने २५ टक्के रक्कम दिली तर लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम करायला सोईचे होईल. त्यामुळे शौचालयाच्या बांधकामाला गती मिळण्यात मदत होईल. यात लाभार्थ्यांना पैशासाठी हात पसरविण्याची गरज उरणार नाही. पंचायत समितीने यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करावा व पैसा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.